झायद खानची हासिल ही मालिका घेणार बेहदची जागा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 12:28 IST2017-07-31T06:57:09+5:302017-07-31T12:28:23+5:30

बेहद ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे गेल्या कित्येक दिवसांपासून म्हटले जात होते. या मालिकेतील मायाच्या भूमिकेत असलेली जेनिफर ...

Will Zayed Khan get a lot of space to achieve this series? | झायद खानची हासिल ही मालिका घेणार बेहदची जागा?

झायद खानची हासिल ही मालिका घेणार बेहदची जागा?

हद ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे गेल्या कित्येक दिवसांपासून म्हटले जात होते. या मालिकेतील मायाच्या भूमिकेत असलेली जेनिफर विंगेट आणि अर्जुनच्या भूमिकेत असलेला कुशल टंडन प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. बेहद या मालिकेत मायाचा मृत्यू झाल्याचे अर्जुनला वाटले होते. पण माया जिवंत आहे हे कळल्यानंतर या मालिकेच्या कथानकाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. आता ही मालिका ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेची जागा हासिल ही मालिका घेणार असल्याचे म्हटले जात आहे.
झायद खानने मैं हू ना, चुरा लिया है तुमने, युवराज यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्याला बॉलिवूडमध्ये त्याचे प्रस्थ निर्माण करता आले नाही. आता तो छोट्या पडद्याकडे वळला आहे. हासिल या मालिकेत तो प्रमुख भूमिकेत दिसणार असून या मालिकेत त्याच्यासोबतच वत्सल सेठ, निकिता दत्ता यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. 
निकिता दत्ताने एक दुजे के वास्ते या मालिकेत काम केले होते. या मालिकेत तिने साकारलेल्या सुमन या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता. पण या मालिकेतील प्रमुख कलाकार अचानक तापाने फणफणले असल्याने त्यांना अनेक दिवस चित्रीकरण करणे जमत नव्हते. त्यामुळे या मालिकेच्या निर्मात्यांनी ही मालिकां बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच रिश्तो का सौदागर बाजीगर या मालिकेतील वत्सल सेठ देखील या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 
हासिल या मालिकेचे निर्माते सिद्धार्थ मल्होत्रा असून त्यांनीच ट्विटरद्वारे या मालिकेची घोषणा केली आहे. त्यांनी या मालिकेच्या टीमचा फोटो पोस्ट करून हासिल ही नवी मालिका सोनी वाहिनीवर येत असल्याचे सांगितले आहे. 
हासिल ही एक रोमँटिक थ्रिलर मालिका असून या मालिकेत झायद खान आणि वत्सल सेठ हे भाऊ दाखवले जाणार आहेत. ते दोघेही निकिता दत्ताच्या प्रेमात पडणार आहेत. या मालिकेत अभिनेत्री शीबादेखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. ती झायद आणि वत्सलच्या आईची भूमिकेत दिसणार आहे. 

Also Read : लहानपणी अशी दिसायची अभिनेत्री जेनिफर विंगेट

Web Title: Will Zayed Khan get a lot of space to achieve this series?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.