‘इक्यावन’ मालिकेतील या नव्या संकल्पनेला स्वीकारले जाईल का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 10:18 IST2018-01-31T04:48:00+5:302018-01-31T10:18:00+5:30
आईविना चार पुरुषांनी संगोपन केलेल्या आणि त्यामुळे पारंपरिक मुलींच्या सवयी नसलेल्या सुशील पारेख (प्राची तेहलान) या मुलीची कथा ‘स्टार ...
‘इक्यावन’ मालिकेतील या नव्या संकल्पनेला स्वीकारले जाईल का ?
आ विना चार पुरुषांनी संगोपन केलेल्या आणि त्यामुळे पारंपरिक मुलींच्या सवयी नसलेल्या सुशील पारेख (प्राची तेहलान) या मुलीची कथा ‘स्टार प्लस’वरील ‘इक्यावन’ मालिकेत चित्रीत करण्यात येत आहे. सुशीलचे पुरुषी कपडे परिधान करणे आणि पुरुषांप्रमाणे वागणे-बोलणे यामुळे ती समाजाच्या उपवर मुलीच्या व्याख्येत बसत नव्हती. त्यामुळे तिचे लग्न होईल की नाही, याचीच शंका होती. परंतु मालिकेच्या कथानकाने आता कलाटणी घेतली असून सुशीलला सत्याच्या (नमिष तनेजा) रूपाने आपल्या पसंतीचा नवरा मिळाला आहे. गतवर्षी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेली नॉटशादीमटेरिअल ही मोहीम मुख्यत्वे करून सुशीलच्याच व्यक्तिरेखेवर आधारित होती. वास्तविक ती सोशल मीडियावरील एक मोहीम होती, पण रातोरात ती व्यापक मोहीम बनली. अनेक महिलांनी सुशीलला पाठिंबा दर्शवून आपले विचार व्यक्त केले.
ज्या मुली या पारंपरिक मुलींच्या सवयी नसतात त्या विशिष्ट प्रकारे वागतात आणि विवाहानंतर त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो, असे अनेक पाहण्यांतून दिसून आले आहे. अशा मुलींच्या अपेक्षांबाबत अनेक नामवंत महिलांनी आपले मत व्यक्त केले होते. यूट्यूबर रिक्षावाली म्हणाली, “मी रिक्षा चालवते आणि त्यामुळे समाजमान्य वधूच्या व्याख्येत मी बसत नाही. म्हणून मी ‘शादीमटेरिअल’ नाही का?” नव्यानेच लग्न झालेली आणि विक्री व्यवस्थापकाची नोकरी करीत असलेली जिनी मुकुंद नायर म्हणाली, “आपल्या मुलीला फार शिकवून तिच्या आकांक्षा वाढवून ठेवल्याबद्दल अनेक माझ्या पालकांना दोषी धरतात, तेव्हा माझं डोकं फिरतं.” काजल ही सामान्य मुलगी म्हणाली, “मला मुलं नको आहेत. पण त्यामुळे मी ‘शादीमटेरिअल’ ठरत नाही का?”
या मालिकेच्या कथानकाला मिळालेल्या वेगळ्या वळणावर अभिनेत्री प्राची तेहलान म्हणाली, नॉटशादीमटेरिअल या मोहिमेतील सुशीलचा आवाज हा भारतातील प्रत्येक मुलीचा आवाज बनला. अशा असामान्य जाहिरात मोहिमेचा मी एक भाग बनले, हा मी माझा बहुमान समजते. आता सुशीलचं लग्न सत्याशी होत असून सत्याने तिला ती जशी आहे, तसं स्वीकारलं आहे. प्रत्येक मुलीच्या जीवनात हा एक महत्त्वाचा भाग असतो. माझ्या लग्नाबाबत मी उत्सुक बनले आहे.”
प्राचीची व्यक्तिरेखा सुशील अशी समजूत करून घेते की सत्याचे तिच्यावर प्रेम आहे आणि त्यामुळे त्याच्याबरोबर ती विवाह लावण्यास आपल्या कुटुंबियांचे मन वळविते. पण आपल्या नशिबात काय वाढून ठेवले आहे, याची तिला कुठे कल्पना असते! पण काहीशी पुरुषी शरीरयष्टी आणि वागणूक असलेल्या सुशीलला अधिक बायकी वागणे-बोलणे शिकण्यास सांगण्यात येते. सध्या तरी प्रेक्षकांना सुशीलला तिच्या नेहमीच्या शर्ट-पॅण्ट या कपड्यांऐवजी वधूच्या वेशात पाहायला मिळणार आहे.