कुछ रंग प्यार के ऐसे भीमध्ये सोनाक्षी गरोदर असल्याचे ऐकून देवला का आनंद झाला नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 12:37 IST2016-12-14T12:37:14+5:302016-12-14T12:37:14+5:30
कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत ईश्वरी आणि सोनाक्षी यांच्यात सगळे काही आलबेल नसल्याचे आपल्याला नेहमीच पाहायला ...
.jpg)
कुछ रंग प्यार के ऐसे भीमध्ये सोनाक्षी गरोदर असल्याचे ऐकून देवला का आनंद झाला नाही?
क छ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत ईश्वरी आणि सोनाक्षी यांच्यात सगळे काही आलबेल नसल्याचे आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. पण आता त्यांच्या नात्याला एक नवी कलाटणी मिळणार आहे. सोनाक्षी गरोदर असल्याची बातमी ईश्वरीला कळल्यानंतर ती प्रचंड आनंदी होणार आहे आणि सोनाक्षीला कुठे ठेवू आणि कुठे नाही असे तिला होणार आहे. एवढेच नव्हे तर तिला जवळ घेऊन ती तिचे अभिनंदनही करणार आहे आणि ही बातमी तिने लगेचच तिच्या पालकांनादेखील कळवावी असेदेखील तिला सांगणार आहे. आपण आजी होणार याचा ईश्वरीला इतका आनंद झाला आहे की ती बिजॉय आणि आशाला स्वतः फोन करून या बातमीबद्दल सांगणार आहे. या बातमीनंतर ईश्वरी आणि सोनाक्षीचे ट्युनिंग इतके छान जमले आहे की, आता काही दिवस सोनाक्षीने केवळ आराम करायलाच असादेखील ती सोनाक्षीला सल्ला देणार आहे.
![Shaheer Sheikh, Erica Fernandes and Supriya Pilgaonkar in Kuch Rang Pyar Ke Aise Bhi]()
सोनाक्षीलादेखील ही बातमी कळल्यापासून ही बातमी देवला कधी सांगू असे झाले आहे. त्यामुळे ती देवला फोन करून घरी लवकर यायला सांगते. सोनाक्षीचे पालकदेखील ही बातमी ऐकून प्रचंड खूश होतात आणि सोनाक्षीच्या घरी तिचे अभिनंदन करायला येतात. सोनाक्षीच्या घरात अतिशय आनंदी वातावरण असताना देव येतो. पण देवालाही ही बातमी ऐकल्यानंतर आनंद होण्याऐवजी तो आर्श्चयचकित होतो.
हा आनंदाचा क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी सगळे फोटो काढण्यात मग्न असताना देवच्या डोक्यात मात्र वेगळाच विचार सुरू अाहे. सोनाक्षी आई होण्याची केवळ सात टक्के शक्यता आहे असेच त्याला डॉक्टरांनी सांगितलेले आहे. त्यामुळे डॉक्टरांचे हेच शब्द त्याच्या डोक्यात फिरत अाहेत. पण सगळ्यांना खूश पाहून आपण काहीही न बोलता शांतच राहावे असे तो ठरवतो. पण आता यानंतर मालिकेच्या कथानकाला एक वेगळीच कलाटणी मिळणार असल्याचे कळतेय.