​या अभिनेत्रीला का येत होती घरच्या जेवणाची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2016 11:28 IST2016-11-08T11:28:17+5:302016-11-08T11:28:17+5:30

परदेस में है मेरा दिल या मालिकेची पटकथा ही परदेशात राहाणाऱ्या एका कुटुंबावर आधारित असल्याने या मालिकेच्या सुरुवातीच्या काही ...

Why did the actress recall the meal of the house? | ​या अभिनेत्रीला का येत होती घरच्या जेवणाची आठवण

​या अभिनेत्रीला का येत होती घरच्या जेवणाची आठवण

देस में है मेरा दिल या मालिकेची पटकथा ही परदेशात राहाणाऱ्या एका कुटुंबावर आधारित असल्याने या मालिकेच्या सुरुवातीच्या काही भागांचे चित्रीकरण ऑस्ट्रीया येथे करण्यात आले होते. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे दृष्टी धामी, अर्जुन बिजलानी सगळेच ऑस्ट्रीयाला गेले होते. तिथे त्यांनी चित्रीकरण करण्यासोबतच खूप धमाल मस्तीदेखील केली. या मालिकेची टीम नुकतीच भारतात परतली असून मालिकेच्या पुढच्या भागांचे चित्रीकरण ते मुंबईत करत आहेत. 
मालिकेचे चित्रीकरण जरी मुंबईत होत असले तरी ते ऑस्ट्रीयात आहेत असेच मालिकेत दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईच्या वातावरणातही त्यांना जाड कपडे घालावे लागत आहे. यामुळे त्यांना चित्रीकरण करणे खूपच कठीण जात आहे. गरम होऊ नये म्हणून या मालिकेतील कलाकार सेटवर सतत आईस्क्रीम खात आहेत. आईस्क्रीमचा भला मोठा ट्रकच मालिकेच्या सेटवर सध्या बोलावला जातो. आईस्क्रीम पार्टीसोबतच सध्या या मालिकेच्या सेटवर थेपला पार्टी सुरू आहे.
दृष्टी धामी अनेक दिवस परदेशात चित्रीकरण करत असल्याने घरचे जेवण खूप मिस करत होती. ऑस्ट्रीयाला बाहेरचे जेवण जेऊन ती येवढी कंटाळली आहे की, ती सध्या हॉटेलमधील जेवण जेवतच नाही. मालिकेच्या सेटवरदेखील ती घरून डबा घेऊन जाते. तिला तिच्या घरात बनवले जाणारे थेपले खूप आवडतात. त्यामुळे सध्या ती मालिकेच्या सेटवर रोज थेपले घेऊन येते. हे थेपले येवढे टेस्टी असतात की, तिच्यासोबत तिच्या मालिकेतील सगळेच कलाकार या थेपल्यांवर यथेच्छ ताव मारतात. 

Web Title: Why did the actress recall the meal of the house?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.