करिश्माला का करावा लागतोय स्वतःचा मेकअप?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 15:43 IST2016-11-04T15:43:59+5:302016-11-04T15:43:59+5:30
नागार्जुन-एक योद्धा या मालिकेद्वारे करिश्मा तन्ना अनेक वर्षांनंतर मालिकेकडे वळली. या मालिकेत ती सध्या प्रेक्षकांना दोन लूकमध्ये पाहायला मिळत ...
करिश्माला का करावा लागतोय स्वतःचा मेकअप?
न गार्जुन-एक योद्धा या मालिकेद्वारे करिश्मा तन्ना अनेक वर्षांनंतर मालिकेकडे वळली. या मालिकेत ती सध्या प्रेक्षकांना दोन लूकमध्ये पाहायला मिळत आहे. करिश्मा या मालिकेत मस्किनी ही भूमिका साकारत आहे. या मस्किनीचा नागलोक आणि धरतीलोकमधील लूक हा पूर्णपणे वेगळा आहे. या दोन्ही लूकमध्ये ती खूपच छान दिसत आहे.या दोन्ही लूकमध्ये आपण छान दिसावे यासाठी ती सध्या खूप मेहनत घेते आहे. एवढेच नव्हे तर करिश्मा या दोन्ही लूकसाठी स्वतःचा मेकअप स्वतःच करते. मालिकेच्या टीमलादेखील करिश्मावर पूर्ण विश्वास असल्याने त्यांनी तिला स्वतःचा मेकअप स्वतः करण्याची परवानगी दिली आहे. तिला धरतीलोकमधील लूकसाठी मेकअप करायला जास्त वेळ लागत नाही. पण नागलोकमधील व्यक्तिरेखेचा मेकअप करण्यासाठी तिला एक तास तरी आरशाच्यासमोर बसावे लागते. तसेच या लूकमध्ये तिने एक मुकूट घातलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा मुकूट जवळजवळ पाच किलोंचा आहे. करिश्मा याविषयी सांगते, "माझा हा लूक छोट्या पडद्यावरील सर्वात ग्लॅमरस लूक आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. आतापर्यंत टिव्हीवर झळकलेल्या सगळ्या नागिनपेक्षा माझा लूक सर्वात चांगला असून यात मी नेहमी गोल्डन कपडे आणि दागिन्यांमध्ये वावरताना प्रेक्षकांना पाहायला मिळते. तसेच मी पाच किलोचा मुकूट तर तीन किलोचे दागिनेही घालते. हा मुकूट घातल्यावर तर माझ्या डोक्यावर कोणीतरी एखादी जड वस्तू ठेवली आहे असेच मला सतत वाटते. त्यामुळे मी चित्रीकरण कधी संपतेय आणि सर्व दागिने मी कधी काढते असेच मला झालेले असते."