अरिना डेच्या का वाटतेय असुरक्षित ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 12:35 IST2018-05-30T07:05:35+5:302018-05-30T12:35:35+5:30

टीव्ही मालिकांच्या क्षेत्रात प्रवेश करणे हे अवघड कार्य असले, तरी तीव्र स्पर्धेमुळे त्यात स्वत:चे स्थान निर्माण करणे ही अधिकच आव्हानात्मक ...

Why Arina Dee feels insecure? | अरिना डेच्या का वाटतेय असुरक्षित ?

अरिना डेच्या का वाटतेय असुरक्षित ?

व्ही मालिकांच्या क्षेत्रात प्रवेश करणे हे अवघड कार्य असले, तरी तीव्र स्पर्धेमुळे त्यात स्वत:चे स्थान निर्माण करणे ही अधिकच आव्हानात्मक बाब आहे. अरिना डे ही प्रसिध्द बंगाली अभिनेत्री हिंदी मालिकांमध्ये कारकीर्द करण्याच्या उद्देशाने मुंबईत आली आणि तिला ‘स्टार भारत’वरील ‘मुस्कान’ या नव्या मालिकेत आरती ही महत्त्वाची भूमिकाही मिळाली. पण बऱ्याच नवख्या कलाकारांप्रमाणे अरिनाच्या मनातही असुरक्षिततेची भावना दडून राहिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार टीव्ही मालिकांच्या क्षेत्रात नवखी असलेल्या अरिना डेच्या मनात सतत अशी भीती आहे की, मालिकेतील लविना टंडन आणि रिचा सोनी यासारख्या प्रस्थापित आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या तुलनेत तिच्याकडे फारसे कुणाचेच लक्ष जाणार नाही किंवा ती नव्या मालिका मिळविण्याच्या स्पर्धेत मागे पडेल. हिंदी मालिकांतील तिच्या अनुभवाच्या अभावी तिला असे वाटते की तिची कामगिरी लविना किंवा रिचा यांच्याइतकी उत्तम होत आहे की नाही. वास्तविक ‘मुस्कान’ मालिकेत अरिनाची भूमिका मध्यवर्ती असून लविना किंवा रिचा या सहाय्यक अभिनेत्रींच्या भूमिकांमध्ये आहेत. अर्थात या मालिकेतील तिची कामगिरी उत्कृष्ट असून निर्माता-दिग्दर्शक तिच्या कामगिरीवर खुश आहेत! आता अरिना आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी करून स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवील की नाही? येत्या लवकरच आपल्याला कळेल. 

‘मुस्कान’ ही नवी मालिका आई आणि तिची मुलगी यांच्यातील नातेसंबंधांना केंद्रस्थानी ठेवलेल्या या मालिकेचा कथाभाग टीव्हीवरील नेहमीच्या सासू-सुनेच्या मालिकांपेक्षा अगदी वेगळा आहे. काही विशिष्ट कारणास्तव आपली आई आरती हिच्यापासून दूर बोर्डिंग स्कूलमध्ये जावे लागते. मालिकेच्या काही प्रसंगांचे चित्रीकरण दार्जिलिंग आणि कोलकाता येथील स्थळांवर प्रत्यक्ष जाऊन करण्यात आले होते. इतकेच नव्हे, तर शाहरूख खानच्या ‘मैं हूँ ना!’ या चित्रपटात दार्जिलिंगमधील ज्या सेंट पॉल स्कूल या बोर्डिंग स्कूलमध्ये चित्रीकरण करण्यात आले होते, त्याच बोर्डिंग स्कूलमध्ये या मालिकेचेही चित्रीकरण करण्यात आले आहे.

Web Title: Why Arina Dee feels insecure?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.