​कोण पटकवणार द व्हॉईस इंडिया किड्सचा किताब?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 04:34 AM2018-03-12T04:34:06+5:302018-03-12T10:04:06+5:30

द व्हाईस इंडिया किड्स हा &TVचा शो आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक एकाहून एक परफॉर्मन्स ...

Who will be the book of The Voice India Kids? | ​कोण पटकवणार द व्हॉईस इंडिया किड्सचा किताब?

​कोण पटकवणार द व्हॉईस इंडिया किड्सचा किताब?

googlenewsNext
व्हाईस इंडिया किड्स हा &TVचा शो आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक एकाहून एक परफॉर्मन्स सादर करत आहेत. त्यामुळे या स्पर्धकांमधून कोण विजेता ठरणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. शोमध्ये आता कानपूरचे शेकिना मुखिया आणि गुंटास कौर, जयपूरचा मोहम्मद फाजिल, गुवाहाटीची श्रुती गोस्वामी, उदमारीची मानसी नाथ आणि अलिपूरदौरची निलांजना रे या सहा स्पर्धकांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. या सर्वांनीच अवघ्या देशाच्या हृदयात स्थान मिळवले आहे आणि आता वेळ आहे प्रेक्षकांनी यातला एक आवाज निवडण्याची... असा आवाज जो त्यांच्या हृदयाला भिडलेला असेल...
द व्हाईस इंडिया किड्सच्या आगामी भागात आता टॉपचे सहा स्पर्धक त्यांच्या लाडक्या कोचसोबत त्यांची आवडीची गाणी गाणार आहेत. हे मेंटर्सही आपापल्या स्पर्धकांना रंगमंचावर साथ देणार आहेत. या शोमधील आजवरच्या प्रवासाविषयी ते गप्पा मारणार आहेत. या मुलांनी संगीताच्या कलेत या कार्यक्रमामुळे चांगलीच प्रगती केली आहे. त्यामुळे हे सगळे स्पर्धक या कार्यक्रमाशी भावनिकरित्या देखील जोडले गेले आहेत. हा कार्यक्रम संपत असल्याने हे स्पर्धक प्रचंड भावुक झाले आहेत. याविषयी कोच पलक मुच्छल सांगते, "सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी कोच शानची फार मोठी फॅन आहे. मला या कार्यक्रमामुळे त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्याला अधिक जास्त आणि वैयक्तिक पातळीवर जाणून घेता आले आणि त्याच्यासोबत कोचिंग पॅनलला असणं ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्याला लाइव्ह परफॉर्म करताना पाहणे हा फारच सुंदर अनुभव होता."
द व्हाईस इंडिया किड्स या कार्यक्रमातील मुलांनी फारच मोठा पल्ला गाठला आहे आणि त्यांना सर्वोत्कृष्ट असेच मार्गदर्शन मिळाले आहे. त्यामुळे 
आता द व्हाईस इंडिया किड्स या पर्वाची ट्रॉफी कोण पटकवणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. काहीच दिवसांत प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा विजेता कोण हे कळणार आहे. 

Also Read : ​शेखरचा खास परफॉर्मन्स वडिलांसोबत

Web Title: Who will be the book of The Voice India Kids?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.