​दुहेरी या मालिकेत जोकरच्या मुखवट्यामागे खरा चेहरा कोणाचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 15:30 IST2017-12-27T10:00:21+5:302017-12-27T15:30:21+5:30

स्टार प्रवाहवर दुहेरी ही मालिका सुरू होऊन आता वर्षं उलटले आहे. या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत ...

Who is the true face of the Joker's face in this series of doubles? | ​दुहेरी या मालिकेत जोकरच्या मुखवट्यामागे खरा चेहरा कोणाचा?

​दुहेरी या मालिकेत जोकरच्या मुखवट्यामागे खरा चेहरा कोणाचा?

टार प्रवाहवर दुहेरी ही मालिका सुरू होऊन आता वर्षं उलटले आहे. या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या असून ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखा या प्रेक्षकांना आता त्यांच्या घरातीलच वाटू लागल्या आहेत. या मालिकेची टीमदेखील मालिका प्रेक्षकांना अधिकाधिक आवडावी यासाठी मेहनत घेत आहे.
दुहेरी या मालिकेच्या कथानकाला मिळत असलेल्या वळणामुळे ही मालिका अधिकच रंजक होत आहे. या मालिकेत सूर्यवंशी कुटुंबाविरोधात बल्लाळ आणि परसू करत असलेल्या कुटील कारस्थानांनी या मालिकेला सध्या चांगलंच वळण मिळाले आहे. मात्र, या कथानकात झालेल्या जोकरच्या एंट्रीने प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या जोकरच्या मुखवट्यामागे खरा चेहरा कोणाचा हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
बल्लाळसाठी काम करणारा परसू त्याच्या विरोधात उभा राहिला आहे. तर जोकरच्या कारस्थानांनी दुष्यंतला पुरतं हैराण केले आहे. या जोकरच्या मुखवट्यामागे परसू आहे की बल्लाळ हे अद्याप तरी कळलेले नाही. मात्र, या दोघांपैकी कोणी नसेल, तर तिसरंच कुणी नवा डाव खेळू पाहातंय का हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे आणि त्यातही हे सगळे करण्यामागे त्या व्यक्तीचा हेतू काय आहे, त्यात कोणाला फायदा होणार आहे, जोकरच्या या कारस्थानांना सूर्यवंशी कुटुंबीय कशा पद्धतीने सामोरे जातं, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जोकरच्या एंट्रीने प्रेक्षकांच्या मनातही मालिकेविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.
आता दुहेरी या मालिकेत पुढे काय घडणार, जोकर काय काय नवे डाव खेळणार, त्याला सूर्यवंशी कुटुंबीय कसे सामोरे जाणार, जोकरच्या मुखवट्यामागे खरा चेहरा कोणाचा, हे सगळं जाणून प्रेक्षकांना दुहेरी मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.
दुहेरी या मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना अनेक घडामोडी पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे या मालिकेचे आगामी भाग प्रेक्षकांना नक्कीच आवडतील अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. 

Also Read : ​'दुहेरी' मालिकेतील बलवंत बल्लाळ प्रेक्षकांना वाटतोय सर्वांत स्टायलिश खलनायक
 

Web Title: Who is the true face of the Joker's face in this series of doubles?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.