​आता कोण म्हणणार बडी दूर से आये है?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 13:12 IST2016-10-22T13:12:33+5:302016-10-22T13:12:33+5:30

सुमित राघवन, रूपाली भोसले, भख्तियार इराणी, तनाझ इराणी यांच्या प्रमुख भूमिका असलेली बडी दूर से आये है ही मालिका ...

Who has come from far away? | ​आता कोण म्हणणार बडी दूर से आये है?

​आता कोण म्हणणार बडी दूर से आये है?

मित राघवन, रूपाली भोसले, भख्तियार इराणी, तनाझ इराणी यांच्या प्रमुख भूमिका असलेली बडी दूर से आये है ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा टिआरपी सुरुवातीच्या काळात खूप चांगला होता. पण दिवसेंदिवस या मालिकेचा टिआरपी ढासळत गेला. या मालिकेच्या कथानकाला दिलेली वळणे प्रेक्षकांना रुचली नाहीत. त्यामुळे ही मालिका बंद करण्याचा निर्णय वाहिनीकडून घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. खिडकी ही मालिका या मालिकेची जागा घेणार असल्याची चर्चा आहे. पण ही मालिका संपणार असल्याबद्दल अद्याप कलाकारांना काहीही कलप्ना नसल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेचे निर्माते जे.डी. मजेठिया यांनीदेखील मालिका संपतेय की नाही हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना काही दिवस वाट पाहावी लागणार असल्याचे सांगितले आहे. 
दुसऱ्या ग्रहावरचे लोक पृथ्वीवर येतात आणि इथलाच एक भाग बनतात. इथले राहाणीमान शिकतात, इथल्या लोकांसारखेच वागायला लागतात, अशी या मालिकेची कथा होती. छोट्या पडद्यावरच्या इतर मालिकांच्या कथांपेक्षा या मालिकेची कथा ही खूप वेगळी असल्याने प्रेक्षकांना ही मालिका सुरुवातीला आवडली होती. पण नंतरच्या काळात ही मालिका रटाळ होत गेली. या मालिकेमुळे पुनित तलरेजा, श्रुती रावत यांसारख्या नव्या कलाकारांना एक वेगळी ओळख मिळाली. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेचे वेगळेपण प्रेक्षकांना चांगलेच भावले. अनेक भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. पण आता ही मालिका नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांना गुडबाय बोलणार असल्याचे कळतेय.

Web Title: Who has come from far away?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.