कुठे गायब आहे Indian Idol फेम अभिजीत सावंत?, व्हायरल होतोय त्याचा हा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 16:09 IST2023-06-29T16:08:39+5:302023-06-29T16:09:31+5:30
Abhijeet Sawant : 'इंडियन आयडॉल'च्या पहिल्या पर्वाचे विजेतेपद गायक अभिजीत सावंतने पटकावले होते. त्याला या शोमधून खूप लोकप्रियता मिळाली होती.

कुठे गायब आहे Indian Idol फेम अभिजीत सावंत?, व्हायरल होतोय त्याचा हा व्हिडीओ
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो इंडियन आयडॉल(Indian Idol)ला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या शोच्या पहिल्या पर्वाने प्रेक्षकांना वेड लावले होते. पहिल्या पर्वाचे विजेते पद गायक अभिजीत सावंत(Abhijeet Sawant)ने पटकावले होते. त्याला या शोमधून खूप लोकप्रियता मिळाली होती. इंडियन आयडॉल संपला, या नवोदित गायकाचा 'आपका अभिजीत सावंत' हा अल्बमही लाँच झाला. २००५ मध्ये अभिजीतनं 'आशिक बनाया आपने' या चित्रपटासाठी गाणंही गायलं. बराच काळ तो लाइमलाइटमध्ये होता. पण एकाएकी काळ, दिवस आणि तंत्रज्ञान सारं काही झपाट्यानं बदलत असताना रिएलिटी शोची संकल्पनाही बदलली आणि नव्या चेहऱ्यांच्या आड अभिजीत गायब झाला.
अभिजीतने २००९ साली रिलीज झालेल्या 'लॉटरी' चित्रपटातून अभिनय क्षेत्रातही त्याचे नशिब आजमावले. त्याने 'तीस मार खान' या चित्रपटातून एक लहानशी भूमिकाही केली होती. पण, त्याच्या अभिनय कारकिर्दीला अपेक्षित यश मिळाले नाही. पुढे त्याने इंडियन आयडॉलमध्ये सूत्रसंचालनही केले. अनेक वर्षे उलटूनही हा अभिजीत तितकाच लोकप्रिय असल्याचे पाहायला मिळाला.
मुख्य प्रवाहापासून दूर अभिजीत सावंत गायनाचे शोज करतच होता. सध्या त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेटकरी वारंवार पाहताहेत. या व्हिडीओमध्ये अभिजीत त्याच्या कुटुंबासह घरातून थेट डिस्नीलँडला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.