लग्न करेल तेव्हा नक्की सांगेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 06:35 IST2016-01-16T01:07:56+5:302016-02-10T06:35:06+5:30

विनोदी अभिनेत्री भारती सिंग हिने आपण सध्याच लग्नाच्या बेडीत अडकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ती पुढील वर्षी तिचा मित्र ...

When will you get married? | लग्न करेल तेव्हा नक्की सांगेल!

लग्न करेल तेव्हा नक्की सांगेल!

नोदी अभिनेत्री भारती सिंग हिने आपण सध्याच लग्नाच्या बेडीत अडकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ती पुढील वर्षी तिचा मित्र आणि लेखक हर्ष लिंबाछिया याच्याशी लग्न करणार असल्याची अफवा होती. यावर तिने स्पष्टीकरण दिले आहे. ती म्हणाली, असे वाटते की लोकांना चर्चेला दुसरे विषयच नाहीत. मला जर लग्न करायचे असेल तर मी सांगणार नाही का? जाहीर घोषणा करून सर्वाना लग्नाला बोलविणारच ना!

भारती ही सध्या 'कामेडी नाईटस् बचाओ'मध्ये व्यस्त आहे. ती म्हणाली मला जवळचे तीन मित्र आहेत. हर्ष हा त्यापैकी एक आहे. आम्ही कायम सोबत असतो आणि स्क्रिप्टवर चर्चा करतो. आम्ही जेवणही बरेचदा सोबत करतो.

त्यामुळे अफवा पसरली असेल. मी सध्या एवढी व्यस्त असते की लग्नाचा विचार करायला वेळही नाही. मला बरेच काही करायचे आहे. कष्ट करायचे आहेत. दिलेले शब्द पाळायचे आहेत.


मी घालत असलेली हिर्‍याची अंगठी मी माझ्याच पैशाने विकत घेतली आहे. ती कुणा दुसर्‍याने भेट दिलेली नाही. कुणी जर ती मला भेट दिलेली असेल तर मला ते लपविण्याची गरज काय, असा भारतीचा सवाल आहे.

Web Title: When will you get married?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.