जेव्हा 'हवा येऊ द्या'चे कलाकार रात्रीस खेळ खेळतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 11:52 IST2016-09-28T06:22:04+5:302016-09-28T11:52:04+5:30

भूत,प्रेत, आत्मा, पिशाच्च या कथानकामुळे पहिल्या भागापासून चर्चेत आलेली मालिका 'रात्रीस खेळ चाले'च्या सेटवर हास्याचे फवारे पाहायला मिळाले. याला ...

When the 'Let the breeze' artists play the game at night. | जेव्हा 'हवा येऊ द्या'चे कलाकार रात्रीस खेळ खेळतात.

जेव्हा 'हवा येऊ द्या'चे कलाकार रात्रीस खेळ खेळतात.

त,प्रेत, आत्मा, पिशाच्च या कथानकामुळे पहिल्या भागापासून चर्चेत आलेली मालिका 'रात्रीस खेळ चाले'च्या सेटवर हास्याचे फवारे पाहायला मिळाले. याला कारणही तसच होतं. 'चला हवा येऊ द्या' च्या विनोदवीरांनी रात्रीस खेळ चालेच्या सेटवर भेट दिली. त्यामुळे या गंभीर वळणाच्या मालिकेच्या सेटवर काहीवेळासाठी कलाकार हास्यविनोदात रमले. काही दिवसांपूर्वीच अशा घटनांमधून कोकणची बदनामी होत असल्याचा आरोप झाल्यामुळे या मालिकेचा ट्रॅकही बदलण्यात आला होता. ट्रॅक बदलल्यानंतरही ही मालिका रंजक वळणावर असताना आता 'चला हवा येऊ द्या' च्या कलाकारांनी भेट दिली आहे.या मालिकेत कोकणातील नाईक कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. या कुटुंबाभोवती एक गूढ असून, काही अदृश्य शक्तींमुळे ब-याचवर्षांपासून या कुटुंबात कुठलेही मंगल कार्य झाले नसल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे.

Web Title: When the 'Let the breeze' artists play the game at night.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.