आस्था अगरवाल शाहरूख खानला भेटते तेव्हा…

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 13:36 IST2017-10-16T08:06:08+5:302017-10-16T13:36:08+5:30

When Ashta Agarwal meets Shahrukh Khan ... | आस्था अगरवाल शाहरूख खानला भेटते तेव्हा…

आस्था अगरवाल शाहरूख खानला भेटते तेव्हा…

नेस्टार आणि त्यांच्या क्रेझी फॅन्सच्या कथा आपण वारंवार ऐकतो, वाचतो आणि पाहतोसुद्धा. या स्टार्सच्या फॅन्सच्या क्रेझीनेसच्या नाना त-हा तुम्हालाही आश्चर्यचकीत करतात. आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्याचा आनंद काही औरच असतो. त्यामुळे त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झालेले असतात.मात्र जेव्हा स्वप्नातही विचार केलेला नसतो त्या व्यक्तींना भेटण्याची संधी चाहत्यांना मिळाली तर. अशीच काहीशी संधी टीव्ही अभिनेत्री आस्था अगरवालची झाली होती. जेव्हा तिच्या समोर साक्षात किंग ऑफ रोमान्स शाहरुख खान तिच्या समोर होता. होय, आस्था इतरांप्रमाणे शाहरुखची मोठी फॅन आहे. त्यामुळे एकदा तरी आपल्या बादशाह शाहरुखला भेटता यावे असे तिचे स्वप्न होते.आणि अखेर  ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ मालिकेच्या सेटवर आस्थाचे शाहरूखला भेटण्याचे स्वप्न पूर्ण झाले.‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ या मालिकेत आस्था प्रार्थना ही भूमिका साकारत आहे. शाहरुखला  भेटल्यानंतर आस्थाला आज मै उपर आसमां निचे अशी काहीशी अवस्था तिची झाली आहे. 

या मालिकेचे चित्रीकरण सुरू असलेल्याच स्टुडिओत शाहरूख खानही त्याच्या चित्रीकरणाच्या कामासाठी आला होता. आपल्याच स्टुडिओत शाहरूख खान आला असून त्याची लवकरच प्रत्यक्ष भेट होण्याची शक्यता आहे, हे लक्षात येताच आस्थाच्या आनंदाला  पारावार राहिला  नव्हता. त्याने एकदा तरी आपल्याकडे बघावे आणि त्याला मिठी मारता यावी, ही तिची खूप इच्छा होती. शाहरूखची  चाहती असलेल्या आस्थाने त्या दिवशी दुपारचे जेवणही घेतले नाही आणि ती स्टुडिओबाहेर त्याची वाट बघत राहिली. शाहरूखशी झालेल्या भेटीबद्दल विचारता आस्था म्हणाली, “मी शाहरूख खानवर पूर्ण फिदा असून त्याची भेट घेण्याचं माझं कित्येक वर्षांपासूनचं स्वप्न होतं. तो आमच्याच स्टुडिओत आल्याचं मला कळताच मी प्रत्येक ब्रेकनंतर सेट बाहेर जाऊन त्याला पाहण्यासाठी उभी राहात होते. मी त्याची खूप मोठी फॅन आहे. त्याचा एकही चित्रपट मी चुकवला नाही.सगळे चित्रपट मी पाहिले आहेत. त्याचे प्रत्येक डायलॉग माझ्या तोंडपाठ आहेत. खरचं शाहरूख खूपच  नम्र आहे. जेव्हा मी त्याच्याजवळ गेले आणि त्याच्याबरोबर एक फोटो काढण्याची विनंती केली, तेव्हा त्याने लगेच होकार दिला. आता त्याच्याबरोबर माझा एक फोटो असावा हे माझे स्वप्न पूर्ण तर झाले आहे.मात्र आता त्याच्या बरोबर चित्रपटात एखादी भूमिका साकारण्याची संधी मिळावे याची स्वप्न मी आत्तापासूनच रंगवू लागली आहे. 

Web Title: When Ashta Agarwal meets Shahrukh Khan ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.