इश्कबाजच्या सेटवर काय सुरू आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 16:12 IST2016-11-04T16:12:18+5:302016-11-04T16:12:18+5:30
इश्कबाज या मालिकेतील रुद्रसिंगची भूमिका साकारणारा लिनेश मट्टू त्याच्या फिटनेसच्याबाबतीत प्रचंड सतर्क आहे. त्याने आता त्याची सहकलाकार नेहालक्ष्मी अय्यरलादेखील ...
.jpg)
इश्कबाजच्या सेटवर काय सुरू आहे?
इ ्कबाज या मालिकेतील रुद्रसिंगची भूमिका साकारणारा लिनेश मट्टू त्याच्या फिटनेसच्याबाबतीत प्रचंड सतर्क आहे. त्याने आता त्याची सहकलाकार नेहालक्ष्मी अय्यरलादेखील फिटनेसचे धडे द्यायला सुरुवात केली आहे. लिनेश आणि नेहालक्ष्मी यांचे मालिकेत लग्न दाखवण्यात येणार आहे. मालिकेत ज्याप्रकारे जे एकमेकांना नेहमी साथ देतात. तसेच खऱ्या आयुष्यातही ते एकमेकांना खूप मदत करतात.
लीनेशला व्यायाम करायला खूप आवडतो. व्यायाम करण्याचा ठरावीक असा कोणताच वेळ ठरलेला नसतो असे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे चित्रीकरणातून वेळ मिळाल्यास तो जिममध्ये जाऊन व्यायाम करतो. मालिकेतील सगळेच कलाकार त्याच्या फिटनेसवर फिदा आहेत. लिनेश आपल्या सहकलाकारांना नेहमीच फिट राहाण्यासाठी टिप्स देत असतो. नेहालक्ष्मीचा तर तो फिटनेस गुरूच बनला आहे. व्यायामाविषयी तसेच डाएटविषयी तो तिला नेहमीच मार्गदर्शन करतो. त्याच्या या टिप्स खूप उपयोगाच्या असतात असे नेहालक्ष्मीचेदेखील म्हणणे आहे. आपल्या या गुरूविषयी नेहालक्ष्मी सांगते, " आमच्या सगळ्यांचा दिवसातील जास्तीत जास्त वेळ हा सेटवरच जातो. त्यामुळे जिमला जाण्यासाठी माझ्याकडे वेळच नसतो. त्यामुळे आता मी सेटवरच व्यायाम करायला सुरुवात केली आहे. खरे तर मला काही इतर अभिनेत्रींप्रमाणे फिगर बनवायची नाहीये. पण केवळ तंदुरुस्त राहाण्यासाठी मी व्यायाम करते. लिनेश स्वतः खूप फिट असल्याने मला यात त्याची खूप मदत होते. मी त्याच्यामुळे आता न चुकता रोज व्यायाम करायला लागली आहे. या मालिकेमुळे सहकलाकाराच्या रूपात मला एक चांगला मित्र मिळाला आहे."