'भाभीजी घर पर हैं' सोडताना सौम्या टंडन काय म्हणाली? बघा कसा होता तिचा सेटवर शेवटचा दिवस!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 02:05 PM2020-08-22T14:05:17+5:302020-08-22T14:14:25+5:30

अफवा अफवा म्हणत आता सौम्याने या बातमीवर शिक्कामोर्तब केलं होतं. काही दिवसांपूर्वीच सौम्या टंडनने याचा खुलासा केला होता की, आता ती भाभीजी घर पर है मालिकेत दिसणार नाही.

What Saumya Tandon said on her last day at Bhabiji Ghar par hain serial set | 'भाभीजी घर पर हैं' सोडताना सौम्या टंडन काय म्हणाली? बघा कसा होता तिचा सेटवर शेवटचा दिवस!

'भाभीजी घर पर हैं' सोडताना सौम्या टंडन काय म्हणाली? बघा कसा होता तिचा सेटवर शेवटचा दिवस!

googlenewsNext

सुपरहिट मालिका 'भाभीजी घर पर है' मध्ये दिसणारी गोरी मेम म्हणजे सौम्या टंडन काही दिवसांपासून फारच चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सौम्या टंडन ही मालिका सोडणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यावेळी सौम्याने ही बातमी अफवा असल्याचं सांगितलं होतं. पण आता सौम्या टंडनने ही मालिका खरंच सोडली आहे.

अफवा अफवा म्हणत आता सौम्याने या बातमीवर शिक्कामोर्तब केलं होतं. काही दिवसांपूर्वीच सौम्या टंडनने याचा खुलासा केला होता की, आता ती भाभीजी घर पर है मालिकेत दिसणार नाही. यावेळी टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना ती म्हणाली की, होय...ही बातमी खरी आहे. मी आता माझा कॉन्ट्रॅक्ट वाढवणार नाहीये. २१ ऑगस्ट माझा सेटवरचा शेवटचा दिवस असेल'.

२१ हा सौम्याचा सेटवरचा शेवटचा दिवस होता. तब्बल पाच वर्षे या मालिकेत काम केल्यानंतर तिला सर्व कलाकारांनी पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला. इतकेच नाही तर शो सोडून जाताना सौम्याच्या डोळ्यातही अश्रू होते. यावेळी सर्वांनी तिच्यासाठी केस कापला आणि गाणंही गायलं.

सौम्याने इन्स्टाग्रामवर तिच्या सेटवरच्या शेवटच्या दिवसाचे व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती शेवटचा दिवस आनंदाने साजरा करताना दिसत आहे. एका व्हिडीओ क्लीपमध्ये सर्वच कास्ट आणि क्रू ने 'तुमको देखा तो ये खयाल आया', अभी ना जाओ छोडकर ही गाणी गायली. 

सौम्याने या मालिकेच्या प्रवासाबाबत लिहिले की, 'एका सुंदर प्रवासाचा अंत. ज्याप्रकारे मी काम केलं, त्यावरून हे लक्षात येतं की, नातं मजबूत होतं. हे मला आयुष्यभर लक्षात राहणारे क्षण आहेत'.

'आता भाभीजी घर पर हैं' मालिकेत अनिता  भाभीची जागा कोण घेणार याची चर्चा सुरू आहे. या भूमिकेसाठी वेगवेगळ्या अभिनेत्रीची नावे घेतली जात आहेत. यात शेफाली जरीवाल हेही एक नाव होतं. पण तिने ही केवळ अफवा असल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता या भूमिकेत कोण दिसणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. 

हे पण वाचा :

Confirm! 'भाभी जी घर पर हैं' मालिका सोडणार अनिता भाभी ऊर्फ सौम्या टंडन, 'हे' धक्कादायक कारण आलं समोर!

Web Title: What Saumya Tandon said on her last day at Bhabiji Ghar par hain serial set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.