'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम हिना खान नव्या मालिकेसाठी घेतेय फिटनेसवर मेहनत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2017 16:38 IST2017-03-27T11:08:10+5:302017-03-27T16:38:10+5:30
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेली अक्षरा म्हणजेच हिना खानने 'ये रिश्ता क्या कहलाता' है मालिका सोडल्यानंतर नवीन मालिकेत झळकण्यासाठी सज्ज ...
.jpg)
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम हिना खान नव्या मालिकेसाठी घेतेय फिटनेसवर मेहनत
छ ट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेली अक्षरा म्हणजेच हिना खानने 'ये रिश्ता क्या कहलाता' है मालिका सोडल्यानंतर नवीन मालिकेत झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र या नवीन मालिकेत ती सुनेच्या भूमिकेत झळकणार नसून एका डॅशिंग अंदाजात पाहयाला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.कारण सध्या हिना खान मोठ्या उत्साहात जिममध्ये तासनतास वर्कआऊट करताना दिसतेय.एरव्ही आपल्या मालिकेतील वेगवगेळे लूकचे फोटो शेअर करणारी हिना आता जिम ट्रेनरसह जिममध्ये वर्कआऊट करतानाचे फोटो शेअर करत असते.या फोटोमुळे हिना तिच्या नवीन मालिकेतील भूमिकेसाठी इतकी मेहनत घेत असल्याचे बोलले जात आहे.नुकतेच 'वारिस' आणि 'बढो बहू' या दोन्ही मालिका एकत्र मिळून दणक्यात होळीचे सेलिब्रेशन करताना हिना खान झळकली होती.विशेष म्हणजे हिना खान साकारत असलेल्या अक्षरा या भूमिकेला रसिक अजूनही विसरलेले नाहीत. मालिका सोडल्यानंतरही हिना खानला तिच्या चाहत्यांकडून सरप्राईज गिफ्ट मिळण्याचा सिलसिला आजही कायम आहे.तिच्या चाहत्यांकडून तिला मिळणारे गिफ्ट्सचे फोटो सोशल मीडियावर टाकत ती चाहत्यांचे आभार मानत असते.2009 पासून सुरू झालेल्या 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या पहिल्या भागापासून हिना खानने रसिकांचे मनोरंजन केले आहे.त्यामुळे हिना ज्या मालिकेसाठी इतकी मेहनत घेत आहे ती मालिका लवकरात लवरकर रसिकांच्या भेटीला येवो हिच रसिकांची इच्छा आहे.
![]()
![]()
![]()