‘हर मर्द को दर्द’ क्या होता है सांगण्यासाठी छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय अनिता कँवल?जाणून घ्या या प्रश्नाचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 14:03 IST2017-01-05T13:23:32+5:302017-01-06T14:03:11+5:30

या नवीन वर्षात ब-याच नवीन मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहेत.त्यात नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच एक नवीन मालिका छोट्या पडद्यावर झळकण्यास ...

What is the 'pain to every man'? What is the answer to this question? | ‘हर मर्द को दर्द’ क्या होता है सांगण्यासाठी छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय अनिता कँवल?जाणून घ्या या प्रश्नाचे उत्तर

‘हर मर्द को दर्द’ क्या होता है सांगण्यासाठी छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय अनिता कँवल?जाणून घ्या या प्रश्नाचे उत्तर

नवीन वर्षात ब-याच नवीन मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहेत.त्यात नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच एक नवीन मालिका छोट्या पडद्यावर झळकण्यास सज्ज झाली आहे.‘हर मर्द का दर्द’ ही नवी विनोदी मालिका लवकरच प्रसारित करण्यात येणार आहे.‘ ‘स्त्री नेमका कसा विचार करते?’ या समाजातील प्रत्येक पुरुषाला पडणार्‍या, परंतु त्याचे उत्तर ठाऊक नसल्यामुळे त्याला ज्या अडचणींना सामोरे जावे लागते, त्यावरंवर मालिकेचे कथानक फिरते.मालिकेची कथा एका पंजाबी कुटुंबावर केंद्रित असून स्त्रीला नेमके काय हवे आहे, याबद्दल असलेल्या संभ्रमामुळे उदभविणा-या परिस्थितीचे चित्रण त्यात करण्यात आले आहे.‘हर मर्द का दर्द’ मालिकेद्वारे टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री अनिता कँवल  छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय..मालिकेत ती नायक फैझल रशीदच्या सासूची भूमिका साकारणार आहे. अनिता आता या नव्या भूमिकेत आपल्या

अभिनयाचे नवे पैलू दाखवून प्रेक्षकांवर आपली जादू टाकण्याचा प्रयत्न करणार असून यासंदर्भात अनिता सांगते की, “मी आता 1 वर्षानंतर पुन्हा एकदा टीव्ही मालिकांमध्ये परतले आहे.एखादा अभिनेता हा कायमचा अभिनेता असतो.हे माझ्याबाबतीत तरी खरं आहे.टीव्ही मालिकांपासून काही काळ दूर राहण्याचा निर्णय मी घेतला होता. थोडा वेळ ब्रेक घेतल्यामुळे कलाकराला त्याला आता कशा प्रकारच्या भूमिका करायच्या आहेत याचे उत्तर सापडण्यास मदत होते. सतत त्याच त्या भूमिका करणे अशा प्रकारच्या साचेबद्ध काम करण्यात मजा नाही. कलाकार हा नेहमी सतत नाविन्य शोधतो असतो त्यामुळे त्याला एक नवीन ऊर्जा मिळते.म्हणून तो रसिकांना चांगले एंटरटेन करू शकतो.म्हणून ब्रेक घेणे गरजेचे आहे.असे अनितला वाटते.मालिकेत फैझल रशीद आणि जिनल बेनल हे या मालिकेतील दोन प्रमुख नायक आहेत.

Web Title: What is the 'pain to every man'? What is the answer to this question?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.