​इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेतील शिवानी तोमरची स्मिता पाटीलसोबत केली जातेय तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2017 11:15 IST2017-06-15T05:45:21+5:302017-06-15T11:15:21+5:30

इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेच्या यशानंतर या मालिकेचा तिसरा सिझन आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या ...

What is the name given to this love and the Shivani Tomb of the series is being done with Smita Patil? | ​इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेतील शिवानी तोमरची स्मिता पाटीलसोबत केली जातेय तुलना

​इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेतील शिवानी तोमरची स्मिता पाटीलसोबत केली जातेय तुलना

प्यार को क्या नाम दूँ या मालिकेच्या यशानंतर या मालिकेचा तिसरा सिझन आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या तिसऱ्या सिझनमध्ये बरुण सोबती आणि शिवानी तोमर प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. बरुण सोबती आणि सान्या इराणी यांची जोडी इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेत चांगलीच गाजली होती. पण या सिझनमध्ये बरुणची जोडी सान्यासोबत नव्हे तर शिवानीसोबत जमली आहे.
शिवानी तोमरने या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केल्यापासून या मालिकेची टीम तिच्यावरच खूप खूश आहे. शिवानी ही खूप चांगली अभिनेत्री असल्याचे या मालिकेच्या टीमचे म्हणणे आहे. या मालिकेत ती चांदनी ही भूमिका साकारत आहे. चांदनी ही अलाहाबादची रहिवाशी असून तिला भगवद्गीतेचे चांगले ज्ञान असल्याचे दाखवण्यात येणार आहे. चांदनी ही पारंपरिक पोशाख आणि ऑक्सिडाइज्डचे दागिने घालते असे मालिकेत दाखवण्यात आले आहे. या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून या मालिकेविषयी प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. तिच्या या मालिकेतील लूकमुळे अनेकांना शिवानीमध्ये स्मिता पाटीलची झाक जाणवत आहे. या संदर्भात शिवानी सांगते, या मालिकेतील माझी वेशभूषा मला खूपच आवडत आहे. या लुकमुळे माझी तुलना स्मिता पाटील यांच्यासोबत केली जात आहे. यामुळे मला स्वतःला खूप आनंद होत आहे. एका दिग्गज अभिनेत्रीसोबत माझी तुलना होणे ही एक सन्मानाची गोष्ट आहे. पण मला अद्याप खूप काही शिकायचे आहे आणि बराच मोठा पल्ला गाठायला आहे. मला स्मिता पाटील यांच्या मार्गावर चालायची इच्छा आहे. 

Web Title: What is the name given to this love and the Shivani Tomb of the series is being done with Smita Patil?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.