​असा साजरा करण्यात आला इस प्यार को क्या नाम दूँ फेम बरुण सोबतीचा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 15:27 IST2017-08-21T09:57:16+5:302017-08-21T15:27:16+5:30

बरुण सोबतीला इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेने खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. सध्या या मालिकेचा दुसरा ...

What is the name of this celebration celebrated as the birthday of Femin Barun Sobti? | ​असा साजरा करण्यात आला इस प्यार को क्या नाम दूँ फेम बरुण सोबतीचा वाढदिवस

​असा साजरा करण्यात आला इस प्यार को क्या नाम दूँ फेम बरुण सोबतीचा वाढदिवस

ुण सोबतीला इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेने खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. सध्या या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला असून यात देखील बरुण महत्त्वाची भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला सध्या प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. बरुण सोबतीचा आज वाढदिवस आहे. त्याचा हा वाढदिवस त्याच्या आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांनी कालच धुमधडाक्यात साजरा केला.
बरुण सोबतीने मालिकांसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता बरुण पुन्हा एकदा एका चित्रपटात झळकणार आहे. तू है मेरा संडे या चित्रपटामध्ये तो काम करत आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेच्या सेटवर जाऊन त्याला खूप चांगले सरप्राईज दिले. रविवारी बरुण दिवसभर त्याच्या मालिकेच्या सेटवर चित्रीकरण करत होता. त्यामुळे तू है मेरा संडे या मालिकेचे निर्माते वरुण शाह, दिग्दर्शक मिलिंद धेमाडे आणि बरुणची पत्नी पश्मीन मनचंदा हे सगळे अचानक त्याच्या सेटवर पोहोचले आणि त्याचा वाढदिवस साजरा केला. याविषयी बरुण सांगतो, रविवारी खूपच पाऊस होता. पण त्यातही सगळ्यांनी मिळून मला सरप्राईज दिले. त्यांना सगळ्यांना पाहून मला प्रचंड आनंद झाला होता. माझ्या वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी माझा अशाप्रकारे धुमधडाक्यात वाढदिवस साजरा होईल असे मला वाटलेच नव्हते. 
तू है मेरा संडे हा चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटात शहाना गोस्वामी, विशाल मल्होत्रा, रसिका दुग्गल देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 

Also Read : बालपणी असे दिसायचे तुमचे लाडके टीव्ही स्टार

Web Title: What is the name of this celebration celebrated as the birthday of Femin Barun Sobti?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.