बिग बॉसमधील या प्रेमकथांचे काय झाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 16:44 IST2016-11-09T16:44:19+5:302016-11-09T16:44:19+5:30
बिंग बॉस आणि प्रेमकथा यांचे खूप जवळचे नाते आहे. बिग बॉसच्या घरात एकदी प्रेमकथा फुलणार नाही असे होऊच शकत ...

बिग बॉसमधील या प्रेमकथांचे काय झाले?
ब ंग बॉस आणि प्रेमकथा यांचे खूप जवळचे नाते आहे. बिग बॉसच्या घरात एकदी प्रेमकथा फुलणार नाही असे होऊच शकत नाही. बिग बॉसच्या प्रत्येक सिझनमध्ये प्रेक्षकांना एक तरी प्रेमकथा पाहायला मिळते. बिग बॉसमध्ये फुललेल्या प्रेमकथा पुढील आयुष्यात टिकतातच असे नाही. आपण एक नजर टाकूया बिग बॉसच्या प्रेमकथांवर...
अरमान कोहली - तनिषा मुखर्जी
अरमान आणि तनिषाच्या प्रेमकथेची चर्चा बिग बॉस हाऊसमध्ये चांगलीच रंगली होती. बिग बॉस 7मधील त्यांच्या किसची चर्चा तर कित्येक दिवस माध्यमांमध्ये होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावरही अनेक ठिकाणी त्यांना एकत्र पाहायला मिळाले होते. पण त्यांनी ब्रेकअप केल्याची बातमी अरमाननेच ट्वीट करून सांगितली होती आणि या ट्वीटला तनिषानेदेखील दुजोरा दिला होता.
![tanisha-mukherjee-and-armaan-kohli]()
वीणा मलिक - अश्मित पटेल
वीणा मलिक आणि अश्मित पटेल ही बिग बॉसमधील एक हॉट जोडी होती. वीणा आणि अश्मितच्या किसिंग सीनवर तसेच वीणाने अश्मितला बॉडी मसाज देण्यावर चांगलीच चर्चा रंगली होती. वीणा अश्मितचे घरात कपडेदेखील धुत असे. त्या दोघांचे प्रेमप्रकरण पाहाता ते दोघे लग्न करतील असे सगळ्यांना वाटत होते. पण बिग बॉस हाऊसच्या बाहेर आल्यानंतर वर्षभरातच त्यांनी ब्रेकअप केले. यावर वीणाने म्हटले होते की, बिग बॉस संपल्यानंतर आम्ही दोघे एकमेकांना अनेकवेळा भेटत असू. पण काही काळानंतर आम्ही दोघे एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळे असल्याचे आमच्या लक्षात आले आणि आम्ही ब्रेकअपचा निर्णय घेतला.
![veena_malik_Ashmit_ patel]()
कुशल टंडन - गोहर खान
कुशल टंडन आणि गोहर खान हे बिग बॉस 7 कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून एकमेकांचे खूप चांगले मित्रमैत्रीण बनले. पण नंतर याच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. कुशलने कॅमेऱ्यासमोर गोहरला प्रपोज केले होते. तसेच घरात कोणतीही भांडणे झाल्यास कुशल गोहरच्या पाठीशी उभा राहात असे. तसेच गोहरला या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवून देण्यातही त्याचा हातभार होता. या कार्यक्रमानंतर या दोघांची जोडी खूप प्रसिद्ध झाली होती. पण अचानक एक दिवस कुशलने त्याचे आणि गोहरचे ब्रेकअप झाल्याचे ट्वीटरवरून त्याच्या फॅन्सना सांगितले.
![Kushal-Tandon-Bigg-Boss-7]()
उपेन पटेल - करिश्मा तन्ना
बिग बॉस 8 चे पर्व उपेन पटेल आणि करिश्मा तन्ना यांच्यामुळे गाजले होते. उपेन आणि करिश्माची केमिस्ट्री बिग बॉस हाऊसमध्ये चांगलीच फुलली होती. घराच्या बाहेर पडल्यावरही ते दोघे लंडनला एकत्र फिरायला गेले होते. त्या दोघांचे फॅन्स त्यांना प्रेमाने उमपा असे म्हणत असत. त्या दोघांनी त्यानंतर नच बलिये या कार्यक्रमातही भाग घेतला. पण या दोघांचे प्रेमप्रकरणदेखील जास्त काळ टिकू शकले नाही. त्यांनी नच बलियेनंतर काहीच महिन्यात ब्रेकअप केले.
![karisma tanna Upen patel]()
गौतम गुलाटी - डायना सोरेस
डायना बिग बॉस 8च्या पर्वात गौतम गुलाटीच्या प्रेमात पडली. या पर्वात दोघे प्रेक्षकांना सतत एकत्र पाहायला मिळाले. त्या दोघांना एकत्र बाथरूममध्ये जातानादेखील पाहाण्यात आले होते. यावरून चांगलाच वाद झाला होता. पण या पर्वानंतर ते दोघे पुन्हा कधीच एकत्र दिसले नाहीत. ते दोघे एकमेकाच्या संपर्कातही नसल्याचे डायनाने मीडियाला सांगितले होते.
![Big_boss_gautam_gulati_diandra_soares]()
राहुल महाजन - पायल रोहात्गी
राहुल महाजनने बिग बॉसच्या घरात एंट्री मारल्यापासूनच तो सगळ्यांशी फ्लर्ट करत होता. पायल रोहात्गी आणि् मोनिका बेदी यांच्यासोबतची त्याची प्रेमकथा प्रचंड गाजली होती. पायलसोबत स्विमिंग पूलमध्ये तो स्विमिंग करतानाही प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता.
![Rahul-Mahajan-Payal-Rohatgi]()