हे काय ग्लॅमसर नेहा पेंडसे आता या लुकमध्ये दिसणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 14:29 IST2016-12-16T14:29:49+5:302016-12-16T14:29:49+5:30
'मे आय कम इन मॅडम' या मालिकेत नेहमी आपल्या ग्लॅमरस अंदाजात दिसणारी नेहा पेंडसे लवकरच अनोख्या अंदाजात पाहायला मिळणार ...
हे काय ग्लॅमसर नेहा पेंडसे आता या लुकमध्ये दिसणार ?
' ;मे आय कम इन मॅडम' या मालिकेत नेहमी आपल्या ग्लॅमरस अंदाजात दिसणारी नेहा पेंडसे लवकरच अनोख्या अंदाजात पाहायला मिळणार आहे.याआधीही या मालिकेतील कलाकारांनी वेगेवळी रूपं बदलत रसिकांचे भरघोस मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा हे कलाकार धम्माल करण्यासाठी सज्ज झाले आहेत.एका येणा-या भागामध्ये नेहा मांजरच्या लुकमध्ये दिसणार आहेत. तिच्यासह संदिप आनंदही माकडच्या लुकमध्ये पाहायला मिळणार आहे.मालिकेच्या कथेनुसार,संदिप आणि नेहा एख थीम पार्टीला जाणार आहेत.या पार्टीसाठी संदिप माकड तर नेहा मांजरच्या लुकमध्ये पार्टीत हजेरी लावतात.याविषयी संदिप सांगतो, की नेहमीच मालिकेत मला रसिकांना वेगवेगळ्या कॉमिक लुकमध्ये पाहिले आहे. त्यानुसार मला माकडाच्या लुकमध्येही रसिकांना पाहणे आवडेल.या भागाची कथा अतिशय कॉमेडी अंदाजात मांडण्यात आल्यामुळे या प्राण्यांचा लुक करावा लागला असे फनी लुक करण्यात मला खूप मजा येते.सेटवरही सगळे मला आणि नेहा मांजर माकड म्हणून चिडवत असल्याचे संदिपने सांगितले. तर नेहाही मांजरलुकमध्ये असल्यामुळे तिलाही खूप मजा वाटली.'मे आय कम इन मॅडम' मालिकेतील मॅडमची भूमिका मला खूप आवडते.विशेष म्हणजे मला माझ्या लुकमध्ये बरेच प्रयोग करता येतात.मालिकेच्या टीमने मला नेहमीच कॉस्चुम निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.एक अभिनेत्री म्हणून मला माझ्या लुकमध्ये प्रयोग करायला आवडतात. नुकतेच मालिकेत संदिपला लेडीज स्विमसुटमध्ये पाहीले होते.तसेच नेहाने वेगेवळे लुक केले केले होते. त्यामुळे अाजपर्यंतच्या सर्व मालिकांमध्ये याच मालिकेत कलाकरांच्या लुकवर प्रयोग करत रसिकांना नाविन्य देण्याचा सतत प्रयत्न करत असल्याचे संदिपने सांगितले.
![]()