क्या कसूर है अमला का या मालिकेतील पंखुरी अवस्थीला झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2017 12:00 PM2017-04-20T12:00:38+5:302017-04-20T17:30:38+5:30

चित्रीकरण करत असताना कलाकारांना काही ना काही दुखापत ही होतच असते. पण त्याही परिस्थितीत ते आपले चित्रीकरण पूर्ण करतात. ...

What is the fault of Amala's death in this series of fever? | क्या कसूर है अमला का या मालिकेतील पंखुरी अवस्थीला झाला अपघात

क्या कसूर है अमला का या मालिकेतील पंखुरी अवस्थीला झाला अपघात

googlenewsNext
त्रीकरण करत असताना कलाकारांना काही ना काही दुखापत ही होतच असते. पण त्याही परिस्थितीत ते आपले चित्रीकरण पूर्ण करतात. क्या कसूर है अमला का या मालिकेत पंखुरी अवस्थी अमला ही मुख्य भूमिका साकारत आहे. नुकतेच चित्रीकरण करत असताना तिला विजेचा धक्का लागला असल्याचे कळतेय. या अपघातमुळे मालिकेचे चित्रीकरणदेखील थांबवण्यात आले होते.  
क्या कसूर है अमला का ही मालिका तुर्कीच्या फातमागुल या मालिकेवर आधारित असून एका सामान्य मुलीची कथा यात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. एका सामान्य मुलीच्या आय़ुष्यात काय काय घडते हे यात प्रेक्षकांना दाखवले जाणार आहे. या मालिकेत पंखुरी प्रमुख भूमिकेत असल्याने तिला या मालिकेसाठी अनेक तास चित्रीकरण करावे लागते. हेच चित्रीकरण करत असताना नुकताच तिला विजेचा शॉक लागला आहे. 
या मालिकेच्या सेटवरील वायरिंगमध्ये काही बिघाड झाल्यामुळे इलेक्टिशियन वायरिंगवर काम करत होते. वीजेच्या कनेक्शमध्ये काहीतरी समस्या निर्माण झाल्यामुळे टीममधील सगळ्यांना हा बिघाड दुरूस्त होईपर्यंत इलेक्ट्रिक बोर्डपासून दूर राहायला सांगितले होते. पण पंखुरीने नकळत एका बोर्डला हात लावल्याने तिला जबरदस्त वीजेचा शॉक लागला. पण तिच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनी तिला यातून वाचवले. यामुळे तिला चांगलीच चक्कर करत होती. तसेच तिच्या हाताला चटका बसला आणि त्याचे व्रणदेखील हाताला दिसत आहेत. या अपघातानंतर डॉक्टरांना लगेचच बोलावण्यात आले. या अपघातामुळे पंखुरी खूप घाबरली होती. तसेच तिला प्रचंड त्रासदेखील होत होता. त्यामुळे मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आले. 

Web Title: What is the fault of Amala's death in this series of fever?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.