​​मानसी शर्मा सेटवर हे काय करतेय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 16:45 IST2016-11-02T16:45:30+5:302016-11-02T16:45:30+5:30

चंद्र-नंदिनी या मालिकेत नंदिनीच्या आईची भूमिका म्हणजेच राणी अवंतिकाची भूमिका अभिनेत्री मानसी शर्मा साकारत आहे. ती या मालिकेत एका ...

What do you do on Mansi Sharma Set? | ​​मानसी शर्मा सेटवर हे काय करतेय?

​​मानसी शर्मा सेटवर हे काय करतेय?

द्र-नंदिनी या मालिकेत नंदिनीच्या आईची भूमिका म्हणजेच राणी अवंतिकाची भूमिका अभिनेत्री मानसी शर्मा साकारत आहे. ती या मालिकेत एका वयस्क बाईच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या मालिकेत ती दहा मुलांच्या आईची भूमिका साकारत आहे. पण खऱ्या आयुष्यात ती वयाने खूपच लहान आहे. तरीही मालिकेतील भूमिका ही आव्हानात्मक असल्याने मी ती स्वीकारली असे ती सांगते. कोणतीही भूमिका स्वीकारताना ती भूमिका किती महत्त्वाची आहे याचा मी आधी विचार करते असेही ती सांगते. इतर मालिकांमधील भूमिकांपेक्षा ही भूमिका खूपच वेगळी आहे. एक अभिनेत्री म्हणून अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारणे गरजेचे आहे असेही तिला वाटते. 
कोणत्याही मालिकेचे चित्रीकरण करत असताना कलाकाराचा संपूर्ण दिवस हा चित्रीकरणातच जातो. त्यामुळे मानसी शर्माने सेटवर मिळणाऱ्या फावल्या वेळात स्वतःचा वेळ घालवण्यसाठी एक वेगळा मार्ग शोधला आहे. तिने बेली डान्स या नृत्याचे शिक्षण घेतले आहे. तिला बार बार देखो या चित्रपटातील तेरी खैर मंगदी या गाण्यावर नाचायला फारच आवडते. ती सेटवर या गाण्यावर अनेकवेळा बेली डान्स करते. या मालिकेत मानसी अतिशय भरजरी वस्त्रं आणि दागिने घालताना आपल्याला पाहायला मिळते. पण तिला वेळ मिळाला की, ती हा लूक बदलते आणि बेली डान्स करते. याविषयी मानसी सांगते, "मी बेली डान्समुळे तंदुरुस्त राहाते असे मला वाटते. बेली डान्स हा केवळ एक नृत्यप्रकार नसून तो व्यामाचाही एक प्रकार आहे. माझा संपूर्ण दिवस सेटवरच जात असल्याने मला जिमला जायला वेळ मिळत नाही. पण यामुळे माझा चांगलाच व्यायाम होतो आणि हे मी खूप एन्जॉयदेखील करते."

Web Title: What do you do on Mansi Sharma Set?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.