​पिया अलबेलाच्या सेटवर अक्षय म्हात्रेने असे काय केले की ज्यामुळे शीन दासला तिचे रडू आवरले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2017 11:19 IST2017-06-09T05:49:17+5:302017-06-09T11:19:17+5:30

पिया अलबेला या मालिकेत अक्षय म्हात्रे आणि शीना दास प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेत अक्षय अतिशय साध्या भोळ्या ...

What did Akshay Mhatre do on Pia Albale's set so that Sheen Das did not stop crying? | ​पिया अलबेलाच्या सेटवर अक्षय म्हात्रेने असे काय केले की ज्यामुळे शीन दासला तिचे रडू आवरले नाही

​पिया अलबेलाच्या सेटवर अक्षय म्हात्रेने असे काय केले की ज्यामुळे शीन दासला तिचे रडू आवरले नाही

या अलबेला या मालिकेत अक्षय म्हात्रे आणि शीना दास प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेत अक्षय अतिशय साध्या भोळ्या मुलाची व्यक्तिरेखा साकारत असला तरी खऱ्या आयुष्यात तो खूप खट्याळ आहे. तो लोकांची मस्करी करण्याची एकही संधी सोडत नाही. 
काही दिवसांपूर्वी अक्षयने शीनची चांगलीच खोटी काढली. अक्षयने केलेल्या या मस्करीमुळे शीनला तिचे अश्रू आवरत नव्हते. पिया अलबेला या मालिकेचे चित्रीकरण सुरू होते. दृश्याच्या मागणीनुसार नरेनला पूजाच्या भांगात कुंकू भरायचे होते. त्याने कुंकू भरू नये म्हणून त्याच्या हातवर शीन मारते असे दृश्य होते. पण अक्षयच्या हातावर शीनने मारल्यामुळे उडालेले कुंकू अक्षयच्या चेहऱ्यावर, नाकावर, डोळ्यांत तसेच तोंडातही गेले. अक्षयने ते कुंकू थुंकले. पण त्यानंतर कुंकवातील काही विषारी रसायनामुळे त्याच्या तोडांतून रक्तस्त्राव झाला असे त्याने सगळ्यांना भासवले. अक्षयची ही अवस्था पाहून शीन चांगलीच घाबरली आणि ती जोराजोरात रडू लागली. आपल्या हातून हे घडले असल्यामुळे ती सतत अक्षयची माफी मागत होती. त्याचवेळी अक्षयने मालिकेच्या सेटवर असलेल्या इतर काही लोकांकडे पाहात डोळे मिचकावले. यावर तो मस्करी करत असल्याचे सगळ्यांनाच कळले आणि सगळे मोठ्यामोठ्याने हसू लागले. यावर अक्षय सांगतो, माझ्याशी ज्यांच्यासोबत चांगली मैत्री आहे. त्यांच्यासोबत मी नेहमीच मस्करी करतो. चित्रीकरण करत असताना शीनाने उडवलेल्या कुंकवाच्या करंड्यातील काही कुंकू माझ्या तोंडात गेले. त्यानंतर मी तोंड धुऊन आलो. पण त्याचवेळी शीनाची मस्करी करावी असा माझ्या मनात विचार आला आणि माझ्या तोंडातून रक्त येत असल्याचे मी तिला भासवले. यामुळे ती खूपच घाबरली होती. 

Web Title: What did Akshay Mhatre do on Pia Albale's set so that Sheen Das did not stop crying?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.