चक्क! चहावाल्यासाठी सुरू केली या कलाकारांनी पिगी बँक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 17:15 IST2016-12-09T15:48:08+5:302016-12-09T17:15:36+5:30

जिथे जातोय तिथे सध्या 500 आणि 1000 च्या नोटाबदलाचेचे विषय रंगाताना कानी पडतायेत. त्यात पैसे मिळण्यासाठी लागणा-या भल्या मोठ्या ...

Well! Piggy bank by the artists started for tea? | चक्क! चहावाल्यासाठी सुरू केली या कलाकारांनी पिगी बँक?

चक्क! चहावाल्यासाठी सुरू केली या कलाकारांनी पिगी बँक?

थे जातोय तिथे सध्या 500 आणि 1000 च्या नोटाबदलाचेचे विषय रंगाताना कानी पडतायेत. त्यात पैसे मिळण्यासाठी लागणा-या भल्या मोठ्या रांगानीही सगळे त्रस्त आहेत. फक्त आपला पैसा आपल्या मिळो आणि येणा-या आर्थिक समस्या टळो याचा विचारांत सगळे आहेत.मात्र ज्यांच्याकडे बँक अकाऊंट तर सोडाच मात्र अगदी तुटपुंजी कमाईवर कुटूंब आपला उदरनिर्वाह करते अशांना या नोटाबदलाची समस्येला सामोरे जाणे कठीण जाते. सध्या मालिकांमध्येही 500 आणि 1000 नोटबंदी हा विषय अनेक मालिकांमध्ये दाखण्यात आला. कलाकारांनीही हा विषय आपापल्या परीने रसिकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला आता त्याही पलिकडे जावून आपल्या लाडक्या कलाकारांना समाजिक भान राखत एक खास पाऊल उचलले आहे.‘परदेस में है मेरा दिल’ या मालिकेच्या  कलाकरांनी  सेटवरच खास पिगी बँक सुरु केली आहे.ज्यांना शक्य आहे, ते त्यात कमी किंमतीच्या नोटा आणि नाणी टाकतात आणि त्यातून चित्रीकरणादरम्यान चहावाल्याला त्याचे पैसे वेळेवर मिळतील,याची खबरदारी घेत आहेत. तसेच ज्या कर्मचा-यांची  बँकेत खाती नाहीत, अशा कर्मचा-यांनाही या पिगी बँकेतून मदत केली जाते. त्यामुळे त्यांच्याकडील 500 व 1000 रुपयांच्या नोटा निरुपयोगी झाल्या, तरी त्यांना या पिगी बँकेतून मदत सुरू असते.त्यामुळे सेटवर मालिकेचे कुटूंब ख-या अर्थाने एक मोठे सुखी कुटुंब बनले आहे.

एकता कपूरच्या मालिकांचे अंतिम भाग जितके नाट्य़पूर्ण आणि उत्कंठावर्धक असतात, तितकाच केंद्र सरकारचा नोटबंदीचा निर्णयही नाट्य़पूर्ण होता. या निर्णयामुळे अनेकांना एक समाज म्हणून जवळ आणले. याचे उदाहरण ‘परदेस में है मेरा दिल’ या मालिकेच्या सेटवर स्पष्टपणे दिसते. या मालिकेच्या सेटवर प्रत्येकजण दुस-यांची विशेषत:आर्थिकदृष्ट्य़ा जे कमकुवत आहेत, त्यांची मदत करीत आहे.आपल्या आवडत्या चहावाल्याच्या मदतीसाठी कलाकारांनी पुढाकार घेणे ही एक कौतुकास्पद बाब आहे.या कलाकरांप्रमाणे इतर कलाकारांनीही आपल्या सेटवर काम करणा-या आपल्या सहकर्मचा-यांना मदतीचा हात द्यावा हीच एक अपेक्षा त्यामुळेच या कर्मचा-यांना त्यांच्या  रोजच्या समस्या कमी नाही पण त्यांच्या समस्यांच्या तुलनेत काही अंशी तरी सुटका होईल हे मात्र नक्की.

Web Title: Well! Piggy bank by the artists started for tea?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.