​रिश्ता लिखेंगे हम नया मध्ये रोहित सुचंतीची झाली अशी फजिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 15:00 IST2018-01-31T09:30:48+5:302018-01-31T15:00:48+5:30

रिश्ता लिखेंगे हम नया मालिकेतील थाट-माट आणि भव्यता यामुळे ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत रतनची भूमिका ...

We will write a relation that Rohit has been mentioned in the novel | ​रिश्ता लिखेंगे हम नया मध्ये रोहित सुचंतीची झाली अशी फजिती

​रिश्ता लिखेंगे हम नया मध्ये रोहित सुचंतीची झाली अशी फजिती

श्ता लिखेंगे हम नया मालिकेतील थाट-माट आणि भव्यता यामुळे ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत रतनची भूमिका रोहित सुचंती साकारत असून दियाच्या भूमिकेत आपल्याला तेजस्वी प्रकाशला पाहायला मिळत आहे. या दोघांच्याही अभिनयाचे सध्या चांगलेच कौतुक होत आहे. या मालिकेत तेजस्वी प्रकाश एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत असल्याने तिचे फॅन्स खूप खूश आहेत. या मालिकेसाठी तिने नुकतेच काही स्टंट केले असून प्रेक्षकांना तेजस्वीचे हे रूप चांगलेच भावले आहे. तेजस्वीप्रमाणेच आता मालिकेत रोहित सुचंती देखील धाडसी स्टंट करताना प्रेक्षकांना दिसत आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळी रोहितला विविध प्रयोग करायला मिळत आहेत. त्यामुळे तो प्रचंड आनंदित आहे. या मालिकेत रोहित आपल्याला नेहमीच पारंपरिक पोषाखात पाहायला मिळतो. रतनची भूमिका साकारणारा रोहित सध्या दियाच्या विवाहाच्या तयारीत गुंतलेला आहे. तिच्या लग्नाच्या तयारीत कोणतीही गोष्ट अपुरी राहू नये यासाठी तो प्रयत्न करत आहे. दियाचा विवाह कोणत्याही गोंधळाशिवाय आणि थाटात झाला पाहिजे असे त्याला वाटत आहे.
आता दियाच्या लग्नाच्या संगीत समारंभात तो एक छान नृत्य सादर करणार आहे. हे गाणे खूपच चांगले असून त्याच्यासोबत अनेकजण या गाण्यावर ताल धरताना दिसणार आहेत. या गाण्याचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले. या दृश्याचे चित्रीकरण करत असताना नृत्यात तल्लीन झालेल्या रोहितच्या हे लक्षातच आले नाही की, त्याच्या पॅंटचे बटण तुटले आहे. तो तल्लीन होऊन नाचतच होता. तेवढ्यात या मालिकेच्या टीममधील एका सदस्याने ही गोष्ट त्याच्या ध्यानात आणून दिली. त्याने शॉट नंतर लगेचच बटण पुन्हा शिवून घेतले. याविषयी रोहित सुचंती सांगतो, “तो एक गंमतीशीर प्रसंग होता आणि मला खरोखर हे कळलेच नाही की चित्रीकरण करत असताना बटण कधी तुटले. मी शॉट पूर्ण केला त्यानंतर एका व्यक्तीने मला धावत येऊन ही गोष्ट सांगितली. खरं तर क्षणभर मी स्तब्ध झालो. माझी ही अवस्था पाहून माझे सहकलाकार प्रचंड हसत होते. पण मी त्याकडे लक्ष दिले नाही. मी बटण शिवून घेतले आणि पुन्हा चित्रीकरण सुरू केले.”

Also Read : ​मकर संक्रातीच्या निमित्ताने रिश्ता लिखेंगे हम नया फेम तेजस्वी प्रकाश वायंगणकरने शेअर केले तिचे सिक्रेट

Web Title: We will write a relation that Rohit has been mentioned in the novel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.