नकारात्मक भूमिका करणे का आवडते तरन्नुमला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2016 16:00 IST2016-12-17T16:00:06+5:302016-12-17T16:00:06+5:30

नेहमीच प्रत्येक कलाकराला सकारात्मक आणि नकारात्मक स्वरूपाच्या भूमिकेत आपण पाहतो काहींना सकारात्मक भूमिका करयाला आवडते तर काहींना नकारात्मक  शेडची ...

Want to play a negative role in Tarnumala? | नकारात्मक भूमिका करणे का आवडते तरन्नुमला?

नकारात्मक भूमिका करणे का आवडते तरन्नुमला?

हमीच प्रत्येक कलाकराला सकारात्मक आणि नकारात्मक स्वरूपाच्या भूमिकेत आपण पाहतो काहींना सकारात्मक भूमिका करयाला आवडते तर काहींना नकारात्मक  शेडची भूमिका करायला आवडते. अशाच प्रकारे कथेनुसार  सकारात्मक पात्रांनी संपन्न असलेली असलेली ‘चंद्र-नंदिनी’ या मालिकेत हेलेनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री तरन्नुमला नेगिटीव्ह शेडची भूमिका साकरणे अधिक आवडते. तिच्या मते विरोधी भूमिका साकारणे हे एक आव्हान असते.मालिकेत अलीकडेच चंद्रगुप्त मौर्य (रजत टोकस) आणि राजकन्या नंदिनी (श्वेता बसू-प्रसाद) यांचा शाही विवाह पार पडला. या विवाहास हेलेनाचा विरोध असल्याने यापुढे ती चंद्रगुप्त व नंदिनी या दोघांचीही विरोधक बनते.अशा प्रकारे तिची व्यक्किरेखा रेखाटण्यात आली होती.

 हेलेना ही व्यक्तिरेखा साकारण्याच्या अनुभवाविषयी तरन्नुमने सांगितले,“ही व्यक्तिरेखा मला खूप आवडली.सुरुवातीला मला माझं उत्तम हिंदी भाषा वापरणं सोडावं लागलं कारण हेलेना ही ग्रीक राजकन्या असून तिचे हिंदी उच्चार ग्रीक हेलेनेनुसार करणे गरजेचं होतं. गेल्या दोन महिन्यांत माझ्या व्यक्तिरेखेचा आलेख पूर्णपणे बदलून गेला आहे. चंद्र-नंदिनी यांच्या विवाहानंतर हेलेना ही पूर्णपणे नकारात्मक व्यक्तिरेखा बनते. हा बदल कथानकाच्या दृष्टीने आवश्यक असून माझ्यासाठी बराच आव्हानात्मक होता.” या अभिनेत्रीच्या लूकनेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचा खुलासा करताना तरन्नुम म्हणाली, “माझा लूक आधुनिक असला, तरी मौर्यकाळाशी समकालीन आहे. ती मूळची ग्रीक राजकन्या असल्याने इतर कलाकारांपेक्षा माझी वेशभूषा भिन्न असणं अगदी स्वाभाविक आहे. पण मला माझी पूर्ण वेशभूषा करण्यासाठी एक तास लागतो.”त्यामुळे इतर कलाकरांच्या लुकप्रमाणे माझ्याही लुकमध्ये मेहनत घेण्यात आली आहे. त्यामुळे सेटवर शूटिंग दरम्यान कॅमेरा फेस करण्याआधीच जेव्हा माझा पूर्ण मेकअप होतो तेव्हा पासूनच मी माझ्या भूमिकेत शिरते. 

Web Title: Want to play a negative role in Tarnumala?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.