व्हॉइस किड्स शोच्या जजेची एंट्री होणार आकाशातून !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 12:24 IST2017-11-10T06:54:01+5:302017-11-10T12:24:01+5:30
व्हॉइस इंडिया किड्स सीझन २ लवकरच टीव्हीच्या पडद्यावर झळकणार आहे आणि अत्यंत धूमधडाक्यात हा शो चालवणारे सेलिब्रिटी प्रशिक्षक आहेत- ...
व्हॉइस किड्स शोच्या जजेची एंट्री होणार आकाशातून !
भारताला आपला सर्वात प्रभावशाली युवा आवाज मिळवून देण्यासाठी आघाडीचा गायक आणि संगीतकार – हिमेश रेशमिया; हसतमुख आणि अद्वितीय प्रतिभेचा गायक शान, भावविभोर आवाजाचा गायक आणि संगीतकार पापोन आणि सर्वात तरुण प्रशिक्षक बनलेली गायिका पलक मुछल अशा चार जबरदस्त प्रशिक्षकांची साथ या पर्वाला लाभली आहे. 'व्हॉइस इंडिया किड्स'चे दुसरे पर्व ११ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. दिव्यांग मुलांमधील प्रतिभेला संधी देण्यापासून ते भारताच्या दुर्गम भागांतील मुलांच्या आजवर कधीही ऐकिवात न आलेल्या संघर्षाचे कौतुक करण्यापर्यंतच्या कित्येक कहाण्या व्हाइस इंडिया किड्सच्या दुस-या पर्वातून उलगडणार असून भारतील प्रतिभावान युवा गायकांनी जपलेले त्यांची कला पाहणे रंजक ठरणार आहे. ७ ते १४ या वयोगटातील मुले आपल्या आवाजाच्या जोरावर प्रशिक्षकांना मंत्रमुग्ध होण्यास भाग पाडतील असे एक से बढकर एक परफॉर्मन्स सादर करताना झळकतील. या सुंदर सांगितिक सफरीमध्ये या छोट्या गायकांचे दोस्त बनून प्रसिद्ध अभिनेता व सूत्रसंचालक जय भानुशाली व त्याचा साथीदार निहार गिते हे दोघे या कार्यक्रमाची रंगत वाढविणार आहेत. बडे मियां आणि छोटे मियां म्हणावे अशी त्यांची कामगिरीही आवर्जून पहावी अशीच असणार आहे.