‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’च्या तिसऱ्या सिझनमध्ये विवेक ओबेरॉय दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 11:46 AM2018-05-15T11:46:14+5:302018-05-15T17:16:14+5:30

भारतातील काही अतिशय गुणी अभिनेत्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने रसिकांची मने जिंकलेला ‘झी टीव्ही’वरील अभिनयगुणांचा शोध घेणाऱ्या ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ या ...

Vivek Oberoi examines the third season of 'India's Best Dramaabaz'! | ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’च्या तिसऱ्या सिझनमध्ये विवेक ओबेरॉय दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत !

‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’च्या तिसऱ्या सिझनमध्ये विवेक ओबेरॉय दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत !

googlenewsNext
रतातील काही अतिशय गुणी अभिनेत्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने रसिकांची मने जिंकलेला ‘झी टीव्ही’वरील अभिनयगुणांचा शोध घेणाऱ्या ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ या रिअॅलिटी कार्यक्रमाची तिसरी आवृत्ती लवकरच प्रसारित केली जाणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वीच्या आवृत्त्यांनी भारतातील अभिनय क्षेत्राला कार्तिकेय राज, तमन्ना दीपक, कार्तिकेय मालवीय आणि प्रणीत यासारखे गुणवान बालकलाकार दिले असून त्यांनी मनोरंजनाच्या क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. आता या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीत भारताचे भावी सुपरस्टार बनविण्याच्या दृष्टीने लहान मुलांमधील कसदार अभिनयगुणांचा शोध घेतला जाणार आहे.

या कार्यक्रमात आता अभिनेता विवेक ओबेरॉय हा परीक्षक म्हणून परतत असून तो या स्पर्धकांना अभिनयगुणांच्या विकासात मदत करणार आहे. या स्पर्धकांकडून प्रेक्षणीय अभिनय सादर व्हावा, यासाठी त्याचे त्यांना बारीक मार्गदर्शन लाभणार आहे.आपल्या या निवडीच्या वृत्ताला दुजोरा देताना विवेक ओबेरॉय म्हणाला, “‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ या रिअॅलिटी कार्यक्रमाशी पुन्हा एकदा संबंध जोडताना मला खूपच आनंद होत आहे.देशातील काही अतिशय गुणवान बालकलाकारांना मी त्यांच्या अभिनयगुणांच्या विकासात मदत करणार असल्याने या कार्यक्रमाचे महत्त्व माझ्या दृष्टीने खूपच आहे. त्यामुळे या मुलांच्या भवितव्याला आकार देण्यात हा कार्यक्रम मदतीचा हात पुढे करतो, असं मला वाटतं. या कार्यक्रमाच्या पूर्वीच्या आवृत्त्यांनी भारतातील अभिनय क्षेत्राला कार्तिकेय राज, तमन्ना दीपक, कार्तिकेय मालवीय आणि स्वस्ती नित्या यासारखे गुणवान बालकलाकार दिले असून अशाच अनेक गुणी बालकलाकारांचा शोध अद्याप सुरू आहे. या बाल स्पर्धकांना मार्गदर्शन करण्याइतकीच या कार्यक्रमात मला खूपच धमाल करता येईल, याचाही मला खूप आनंद होत आहे.”


सोनालीने विविध प्रकारच्या भूमिका साकारत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.छम छम करता हैं... या 'अगं बाई अरेच्चा' सिनेमातील गाण्यावर थिरकत सोनालीने रसिकांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.सोनालीच्या अभिनयासोबतच तिचा डान्स आणि स्टाईलसुद्धा रसिकांवर जादू करुन गेली आहे.आता ‘झी टीव्ही’वरील ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ या  रिअॅलिटी शोच्या तिस-या सिझनमध्ये परिक्षक म्हणून झळकणार आहे.

Web Title: Vivek Oberoi examines the third season of 'India's Best Dramaabaz'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.