'गुलाम' मालिकेत विशाल पुरी नव्या जागिरच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2017 11:49 IST2017-04-10T06:19:19+5:302017-04-10T11:49:19+5:30

रिमिक्समध्ये पुनितच्या भूमिकेत गाजलेला विशाल पुरी आता 'गुलाम'मालिकेत एंट्री करण्यासासाठी सज्ज झाला आहे.जागिरच्या भूमिकेत दिसणारा जय यादवच्या जागेवर आता ...

Vishal Puri plays a new awakening in the 'Slave' series | 'गुलाम' मालिकेत विशाल पुरी नव्या जागिरच्या भूमिकेत

'गुलाम' मालिकेत विशाल पुरी नव्या जागिरच्या भूमिकेत

मिक्समध्ये पुनितच्या भूमिकेत गाजलेला विशाल पुरी आता 'गुलाम'मालिकेत एंट्री करण्यासासाठी सज्ज झाला आहे.जागिरच्या भूमिकेत दिसणारा जय यादवच्या जागेवर आता विशालची वर्णी लागली आहे.अचानक जयने ही मालिका का सोडली यांवर सध्या तर्कवितर्क सुरू असून जयने यांवर स्पष्टीकरण देण्यात आलेले नाहीय.मुळात मालिकेचे निर्माते जयच्या परफॉर्मन्सवर खूष नव्हते म्हणून त्याच्या जागेवर  विशालला घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळतंय.मालिकेत विशालच्या एंट्रीनंतर आगामी भागातील कथानकात बरेच नवे वळण बघायला मिळतील.विशालला याबाबत विचारले असता तो म्हणाला, हरयाणवी भाषा बोलण्यासाठी मला बराच सराव करावा लागला. या भाषेत प्रभुत्व असणाऱ्यांसह मी काही वेळ घालवला. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करतोय मात्र जेव्हा ऑनस्क्रीन रसिक मला पाहतील त्यांच्याकडून मिळणा-या   प्रतिक्रीया माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.त्यामुळे थोडे दडपण आले असून सध्यातरी होपिंग फॉर द बेस्ट रसिकांनाही माझी ही भूमिका आवडेल अशी आशा करतो.

विशाल पुरीने या मालिकेआधी 'क्योंकी सास भी कभी बहू थी','कुसुम', 'डोली अरमानोंकी' या मालिकेतील त्याच्या भूमिकेचेही खूप कौतुक करण्यात आले होते.त्याच बरोबर छोट्या पडद्यावरची सुपरहीट ठरलेली मालिका 'नागिन 2'मध्येही तो वेगळ्या भूमिकेत झळकला होता.त्याने आजवर केलेल्या मालिकेतील भूमिकेमुळेच तो सतत प्रकाशझोतात राहिला. आता पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत तो झळकणार आहे.यासाठी तो खूप खुश असून मालिकेत मिळालेली भूमिका पूर्ण न्याय देण्यासाठी तो विशेष मेहनतही घेतोय. त्यामुळे मालिकेच्या निर्मात्यांनी विशाल पुरीवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  

Web Title: Vishal Puri plays a new awakening in the 'Slave' series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.