विराजस कुलकर्णी अडकला लग्नबंधनात ? फोटोंवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 12:15 PM2020-11-26T12:15:37+5:302020-11-26T12:16:16+5:30

या मालिकेतील नायिका ही गौतमी देशपांडे असून ती प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहीण आहे. तिने याआधी सोनी मराठीच्या सारे तुझ्याचसाठी या मालिकेत काम केले होते.तर विराजस कुलकर्णी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे.

Virajas Kulkarni Wedding Photo Caught Everyone Attention On Social Media | विराजस कुलकर्णी अडकला लग्नबंधनात ? फोटोंवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

विराजस कुलकर्णी अडकला लग्नबंधनात ? फोटोंवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'माझा होशील ना' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता विराजस कुलकर्णी प्रेश्रकांचा आवडता बनला आहे. विराजला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. ही माहिती त्यानं स्वत:च चाहत्यांना सांगितली होती. त्यानंतर त्याचा आणखीन एक फोटो समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत विराजस बाशिंग बांधल्याचे पाहायला मिळत आहे. विराजस  फोटो पाहून त्याच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. 

‘लग्न’ ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट. त्यामुळे आपले आवडते सेलिब्रेटींच्या लग्नाविषयी जाणून घेण्यात चाहत्यांना प्रचंड रस असतो.सध्या सगळीकडे लग्नाचा मौसम सुरु आहे. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीमंडळीसुद्धा रेशीमगाठीत अडकत आहेत. फोटो पाहून विरासचे लग्न झाल्याचे काहींना वाटत आहे.मात्र हा फोटो विरासजच्या रिअल लग्नाचा नाहीतर रिल लग्नाचा आहे.  मालिकेत लवकर विराजस लग्नाचा ट्रॅक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे फोटो पाहून तरूणी निराश झाल्या असतली तर खास त्यांच्यासाठी विरासज अजूतरी सिंगल आहे. मालिकेतल्या त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव आदित्य कश्यप असं असून, त्याचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.  


या मालिकेतील नायिका ही गौतमी देशपांडे असून ती प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहीण आहे. तिने याआधी सोनी मराठीच्या सारे तुझ्याचसाठी या मालिकेत काम केले होते.तर विराजस कुलकर्णी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. विराजस हा खूप चांगला लेखक आणि दिग्दर्शक असून त्याने हॉस्टेल डेज या चित्रपटात काम केले होते. माझा होशील ना... या मालिकेत विराजस आणि गौतमीसोबतच विनय येडेकर, निखिल रत्नपारखी, सुनील तावडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Web Title: Virajas Kulkarni Wedding Photo Caught Everyone Attention On Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.