​गुलामच्या सेटवर विकास मनकतलाने मारले सारीका ढिल्लोनला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2017 14:59 IST2017-06-20T09:29:32+5:302017-06-20T14:59:32+5:30

मालिकांच्या सेटवर अपघात होणे काही नवीन नाही. नुकतेच दिल से दिल तक आणि एक शृंगार स्वाभिमान या मालिकांच्या महासंगम ...

Vikas Manchtala, the slave of the slave, hit the bullshit | ​गुलामच्या सेटवर विकास मनकतलाने मारले सारीका ढिल्लोनला

​गुलामच्या सेटवर विकास मनकतलाने मारले सारीका ढिल्लोनला

लिकांच्या सेटवर अपघात होणे काही नवीन नाही. नुकतेच दिल से दिल तक आणि एक शृंगार स्वाभिमान या मालिकांच्या महासंगम भागाचे चित्रीकरण करत असताना सिद्धार्थ शुक्ला आणि अंकिता शर्मा यांना चांगलीच दुखापत झाली. या चित्रीकरणाच्या वेळी दोघेही खड्ड्यात पडले. त्यामुळे सिद्धार्थच्या पायाला तर अंकिताच्या कोपऱ्याला चांगलेच लागले. आता यानंतर गुलाम या मालिकेच्या सेटवर अपघात झाला. 
गुलाम या मालिकेत सारीका ढिल्लोन रश्मीची व्यक्तिरेखा साकारते. चित्रीकरण करत असतात सहकलाकारामुळे तिच्या चेहऱ्याला चांगलीच दुखापत झाली आहे आणि त्यामुळे तिला रुग्णालयात न्यावे लागले. मालिकेचे चित्रीकरण सुरू व्हायच्याआधी एका दृश्याची सारीका आणि विकास मनकतला तालीम करत होते. दृश्यात विकासला सारीकाला एका धारधार शस्त्राने मारायचे होते. पण तालीम करत असताना त्याचा अंदाज चुकला आणि त्या धारधार शस्त्राचे टोक सारीकाच्या चेहऱ्याला लागले. कोणाला काही कळायच्या आतच तिच्या चेहऱ्यातून भळाभळा रक्त वाहू लागले. त्यामुळे तिला लगेचच रुग्णालयाच नेण्यात आले आणि त्यावर उपचार करण्यात आले. या प्रसंगाविषयी सारीका सांगते, सेटवर अपघात झाला हे खरे आहे. माझ्या डोळ्याच्या खाली चांगलेच लागले आहे. माझे भाग्य चांगले असल्याने माझ्या डोळ्याला काहीही दुखापत झाली नाही. मला लागल्यानंतर लगेचच प्रोडक्शन टीममधील मंडळींनी मला रुग्णायलात नेले. डॉक्टरांनी मला तीन-चार दिवस तरी चित्रीकरण करण्यास मनाई केली आहे. मेकअप चेहऱ्याला दोन-तीन दिवस तरी लावायचा नाही असे डॉक्टरांनी सांगितले आहे. पण गुलाम मालिकेच्या टीमला माझ्यामुळे काहीही त्रास होऊ नये म्हणून मी चित्रीकरण करत आहे. ही मालिका माझ्यासाठी खूप खास आहे. 

Must read : विकास मनकतलाने का थांबवले गुलामचे चित्रीकरण

Web Title: Vikas Manchtala, the slave of the slave, hit the bullshit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.