विकास खन्ना यावर्षी अडकणार लग्नबंधनात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2016 16:03 IST2016-11-07T16:03:12+5:302016-11-07T16:03:12+5:30

विकास खन्ना मास्टर शेफच्या पहिल्या सिझनपासून परीक्षकाची भूमिका साकारत आहे. आज तो मास्टर शेफचा चेहराच बनला आहे. विकास खन्ना ...

Vikas Khanna to get married this year? | विकास खन्ना यावर्षी अडकणार लग्नबंधनात?

विकास खन्ना यावर्षी अडकणार लग्नबंधनात?

कास खन्ना मास्टर शेफच्या पहिल्या सिझनपासून परीक्षकाची भूमिका साकारत आहे. आज तो मास्टर शेफचा चेहराच बनला आहे. विकास खन्ना गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे. पण तो तितका प्रसिद्ध नव्हता. खऱ्या अर्थाने मास्टरशेफ या कार्यक्रमामुळे विकासला प्रसिद्धी मिळाली. शेफला सेलिब्रेटी स्टेटस मिळवून देण्यामध्ये आज विकास खन्नाचा मोठा हातभार आहे. 
विकासचे स्पर्धकांसोबत वागणे, त्यांना प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन देणे, विकासची स्माइल प्रेक्षकांना खूपच आवडते. महिला चाहत्यांमध्ये तर तो चांगलाच प्रसिद्ध आहे. अनेक मुली त्याच्यावर फिदा आहेत. एका मासिकाने तर त्याला सेक्सिएस्ट मॅनची पदवीदेखील दिली आहे. सध्या विकास मास्टर शेफच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. पण त्याचसोबत तो सध्या जोडीदाराच्या शोधातदेखील असल्याचे म्हटले जात आहे.
विकास नुकताच अमृतसरला त्याच्या कुटुंबियांना भेटायला गेला होता. त्याने अमृतसरला जाऊन आई आणि भावासोबत सुवर्णमंदिरात दर्शनदेखील घेतले होते. तसेच त्याने त्याचे या भेटीदरम्यानचे काही फोटो आणि त्याचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तो लवकरच लग्न करणार असल्याचे त्याच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे. त्याचा मित्र सुमेर पसरीचा नुकताच मास्टर शेफच्या सेटवर गेला होता. त्याने त्याच्या लाडक्या मित्राला तू लग्न कधी करणार आहेस हा प्रश्न विचारला. तसेच विकासला लग्नाचे अनेक प्रस्ताव येत असून चांगला जोडीदार मिळत नाही तोपर्यंत तो लग्नाचे प्रस्ताव टाळत राहाणार आहे असे दिसतेय असे म्हणत त्याने विकासची टरदेखील उडवली. 


Web Title: Vikas Khanna to get married this year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.