​उडान या मालिकेत होणार विकास भल्लाची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 12:19 IST2017-09-13T06:49:26+5:302017-09-13T12:19:26+5:30

उडान या मालिकेचे कथानक आणि या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. आता या मालिकेत एक नवी एंट्री होणार ...

Vikal Bhalla's entry to fly in the series | ​उडान या मालिकेत होणार विकास भल्लाची एंट्री

​उडान या मालिकेत होणार विकास भल्लाची एंट्री

ान या मालिकेचे कथानक आणि या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. आता या मालिकेत एक नवी एंट्री होणार आहे. या मालिकेत विकास भल्ला आता मुख्य भूमिकेत झळकणार असून त्याने या मालिकेचे चित्रीकरण करायला सुरुवात देखील केली आहे.
विकास भल्ला हा एक प्रसिद्ध अभिनेता असण्यासोबतच एक प्रसिद्ध गायक देखील आहे. तो उडान या मालिकेत रणविजय ही भूमिका साकारणार असून ही व्यक्तिरेखा खूपच वेगळी असणार आहे. तो या मालिकेत इन्सपेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. तो एककेंद्री, भावनाशील पण बेभरवंशी असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. चकोरचे रक्षण करण्यासाठी या मालिकेत त्याचा प्रवेश होणार आहे. तो स्पष्टवक्ता असून नैतिकदृष्ट्या सरळमार्गी आहे. त्यामुळे त्याच्या स्वभावाने प्रभावित झालेली चकोर त्याच्या घरात आश्रय घेण्याचे ठरवणार आहे. विकास भल्लाने अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. कुसूम, कोई अपना सा, जस्सी जैसी कौई नही या त्याच्या मालिका तर प्रचंड गाजल्या होत्या. पण गेल्या अनेक वर्षांपासून तो छोट्या पडद्यापासून दूर आहे. त्याने 2013 मध्ये उतरण या मालिकेत काम केले होते. त्यानंतर तो 2015 मध्ये बिग बॉस या कार्यक्रमात झळकला. आता तो दोन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. याविषयी विकास सांगतो, उडान ही मालिका सगळ्यांनाच खूप आवडते. या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मी गेली अनेक वर्षं चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत आहे. पण मी कधीच इन्सपेक्टरच्या भूमिकेत झळकलो नव्हतो.  पहिल्यांदाच मला पोलिसाची भूमिका साकारायला मिळत आहे. त्याचा मला आनंद होत आहे. रणविजय या व्यक्तिरेखेला असलेल्या अनेक छटांमुळे या व्यक्तिरेखेने मला भुरळ घातली. या व्यक्तिरेखेच्या मी प्रेमात पडलो होतो. ही व्यक्तिरेखा अधिकाधिक चांगल्याप्रकारे मला साकारता यावी यासाठी मी माझ्या एका मित्राची मदत घेतली. माझा हा मित्र पोलिस असल्याने ही भूमिका साकारण्यास मला खूप मदत झाली. माझी ही भूमिका प्रेक्षकांना आवडेल अशी मला खात्री आहे. 

Also Read : ​‘उडान’चा हीरो पारस

Web Title: Vikal Bhalla's entry to fly in the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.