विद्या बालन या कार्यक्रमाचे करणार सूत्रसंचालन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 11:32 IST2016-11-10T11:32:02+5:302016-11-10T11:32:02+5:30
विद्या बालन सध्या कहानी 2 या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे प्रमोशन ती छोट्या पडद्यावरही करणार आहे. याआधीही ...
विद्या बालन या कार्यक्रमाचे करणार सूत्रसंचालन
व द्या बालन सध्या कहानी 2 या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे प्रमोशन ती छोट्या पडद्यावरही करणार आहे. याआधीही द डर्टी पिक्चर या चित्रपटाचे प्रमोशन तिने बडे अच्छे लगते है या मालिकेत केले होते. आता ती सावधान इंडिया या कार्यक्रमाच्या एका भागाचे सूत्रसंचालन करणार आहे.
विद्या बालनने तिच्या अभिनयप्रवासाला छोट्या पडद्यापासूनच सुरुवात केली होती. हम पाच या मालिकेत तिने साकारलेली राधिका ही प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. छोट्या पडद्यावर प्रसिद्धी मिळाल्यानंतर विद्या मोठ्या पडद्याकडे वऴली. पण मोठ्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर विद्याला छोट्या पडद्यावर काम करायला वेळच मिळाला नाही. केवळ ती तिच्या चित्रपटांचे प्रमोशन छोट्या पडद्यावर करताना पाहायला मिळाली. आता कहानी 2 या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे.
विद्यासाठी कोणत्याही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे ती खूपच उत्सुक आहे. याविषयी विद्या सांगते, "सावधान इंडिया हा कार्यक्रम गुन्हेगारी विरोधात समाजात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. डर के नही डट कर हे त्यांचे ब्रीदवाक्य मला खूप आवडते. आजच्या काळात या ब्रीदवाक्याची आपल्याला सगळ्यांनाच गरज आहे. गुन्हेगारीचा लोकांनी विरोधच नव्हे तर मुकाबलाही केला पाहिजे हा या कार्यक्रमाद्वारे दिला जाणारा संदेश मला खूपच भावला. या कार्यक्रमाचे मला सूत्रसंचालन करता आले याचा मला प्रचंड आनंद होत आहे."