मराठी अभिनेत्रीनं मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांना पोस्ट टॅग करत व्यक्त केला संताप, काय प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 09:10 IST2025-10-15T09:09:08+5:302025-10-15T09:10:13+5:30
मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत , मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांना म्हणाली...

मराठी अभिनेत्रीनं मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांना पोस्ट टॅग करत व्यक्त केला संताप, काय प्रकरण?
ठाणे-घोडबंदर रोडवरील (Ghodbunder Road) वाहतूक कोंडी (Traffic Jam) आणि रस्त्यांची दुरवस्था ही केवळ सामान्य नागरिकांसाठीच नव्हे, तर सेलिब्रिटींसाठीही मोठी डोकेदुखी ठरत आहे. अभिनेत्री विदिशा म्हसकरनं अपघात आणि वाहतूक कोंडीवर संताप व्यक्त केला आहे.
विदिशा म्हसकरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये घोडबंदर रोडवर एका जोडप्याचा अपघात झाला असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यासोबत तिनं लिहिलं, "देवाने मला पृथ्वीवर चांगला वेळ घालवायला पाठवलं, पण मी घोडबंदर येथे वाहतूक कोंडीत अडकलेय. हे अत्यंत लाजिरवाणं आहे". पुढे तिने थेट प्रशासनाला सवाल केला, "आम्ही कर (Tax) का भरतोय? आम्हाला काही महागड्या गोष्टी नको आहेत. ही एक मूलभूत आणि महत्त्वाची गरज आहे", या शब्दांत तिनं प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
नेत्यांना टॅग करून केली लक्ष देण्याची मागणी
या समस्येकडे तातडीने लक्ष वेधण्यासाठी विदिशा म्हसकरनं ही पोस्ट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांना टॅग करत विनंती केली की, "आम्ही दररोज हा त्रास सहन करतोय, कृपया याकडे लक्ष द्या".
विशेष म्हणजे, घोडबंदर रोडच्या दुरवस्थेवर आवाज उठवणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये विदिशा म्हसकर एकटी नाही. यापूर्वीही अभिनेता मिलिंद फाटक, सुरभी भावे, ऋतुजा बागवे, जुई गडकरी, रुपाली भोसले यांच्यासह अनेक कलाकारांनी या रस्त्यावरील जीवघेण्या वाहतूक कोंडीबद्दल आणि खड्ड्यांबद्दल वेळोवेळी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कलाकारांना अनेकदा ठाणे-घोडबंदर या रस्त्यावरुनच कलाकारांना त्यांचं शूटिंगचं ठिकाण गाठावं लागतं. वाहतुक कोंडी आणि घोडबंदर रोडच्या दुरवस्थेमुळे शूटिंगला पोहोचायला उशीर होतो.