VIDEO: लग्न मंडपात पोहचताच हृता दुर्गुळेला कोसळलं रडू, लग्नातील भावुक क्षण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 10:46 AM2022-05-19T10:46:46+5:302022-05-19T10:47:10+5:30

Hruta Durgule And Prateek Shah Wedding: हृता दुर्गुळेने प्रतीक शाहसोबत लग्नगाठ बांधून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. नुकताच सोशल मीडियावर हृताचा लग्नातील एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

VIDEO: Hruta Durgule emotional her wedding day, video goes viral | VIDEO: लग्न मंडपात पोहचताच हृता दुर्गुळेला कोसळलं रडू, लग्नातील भावुक क्षण आले समोर

VIDEO: लग्न मंडपात पोहचताच हृता दुर्गुळेला कोसळलं रडू, लग्नातील भावुक क्षण आले समोर

googlenewsNext

Hruta Durgule And Prateek Shah Wedding : मराठी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे(Hruta Durgule)ने आपल्या अभिनय आणि सौंदर्यांच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. तिला महाराष्ट्राची क्रशदेखील म्हटले जाते. तरूणाईमध्ये तिची खूप क्रेझ आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. दरम्यान हृता दुर्गुळे हिने तिचा प्रियकर प्रतीक शाह(Prateek Shah)सोबत लग्नगाठ बांधून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. नुकताच सोशल मीडियावर हृताचा लग्नातील एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत हृता लग्नमंडपात पोहचताच इमोशनल झाल्याचे पाहायला मिळते आहे.

हृता दुर्गुळेचा सोशल मीडियावर लग्नातील एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत हृता हॉलमध्ये एन्ट्री करताना दिसते आहे. परंतु लग्नाच्या मंडपात पोहोचल्यानंतर ती अत्यंत भावुक झाली आणि तिला अश्रू आवरणे कठीण झाले होते. ती रडताना दिसते आहे.अभिनेत्रीला पाहून तिच्या आईच्या डोळ्यात सुद्धा अश्रू तरळले. सध्या हृताचा हा व्हिडीओ पाहून चाहतेदेखील इमोशनल झाले आहेत. तसेच अभिनेत्रीला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. 

हृता दुर्गुळे हिने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर तिचा आणि प्रतीक शाहचा फोटो शेअर करून रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले होते. त्यांनतर २४ डिसेंबर २०२१ ला या दोघांनी साखरपुडा केला होता. हे दोघे लग्न कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र त्यांनी गुपचूप लग्न करत सर्वाना सुखद धक्का दिला आहे.


प्रतीक शाह हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. 'तेरी मेरी इक जिंदडी', 'बेहद २', 'बहु बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'एक दिवाना था' यासारख्या मालिकांचे दिग्दर्शन त्याने केले आहे.

Web Title: VIDEO: Hruta Durgule emotional her wedding day, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.