"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 11:00 IST2025-08-19T10:58:17+5:302025-08-19T11:00:09+5:30

"मी तो क्षण कधीच विसरु शकत नाही...", वीणा जामकर काय म्हणाली?

veena jamkar shared emotional memory of jyoti chandekar after actress demise | "२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण

"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर (Jyoti Chandekar) यांचं १६ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झालं. 'ठरलं तर मग' मालिकेतील पूर्णा आजी म्हणून त्यांना सगळेच ओळखत होते. याआधी त्यांची मोठी कारकीर्द राहिली आहे. रंगभूमीवरुन त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती. 'सुंदर मी होणार', 'मिसेस आमदार सौभाग्यवती' ही त्यांची गाजलेली मराठी नाटकं. तसंच 'मी सिंधूताई सपकाळ, 'श्यामची आई', 'उंबरठा', 'ढोलकी' अशा सिनेमांमध्ये त्या दिसल्या. हिंदी सिनेमातही त्यांनी भूमिका साकारल्या. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या शेवटच्या काळात त्या मालिकांमध्ये सक्रीय होत्या. अभिनेत्री वीणा जामकरने त्यांची एक भावुक आठवण सांगितली आहे.

वीणा जामकरने (Veena Jamkar) इन्स्टाग्रामवर ज्योती चांदेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांची आठवण सांगत ती लिहिते, "भावपूर्ण श्रद्धांजली ज्योती ताई..... तुम्ही अशा अचानक निघून जाल असं वाटलंच नाही... माझ्या पहिल्या सिनेमातल्या ( बेभान ), करिअर मधल्या पहिल्या ज्येष्ठ अभिनेत्री आहात तुम्ही.. सिनेमा Acting ची पहिली मुळाक्षरं मी तुम्हाला बघून गिरवली आहेत... 26 जुलै च्या पूरादरम्यान आपलं शूट चालू होतं.. पनवेलच्या सुर्वे फार्महाऊसला सगळीकडे पाणी भरलं होतं. प्रॉडक्शन मॅनेजरने संरक्षण म्हणून मला तुमच्या रूममधे शिफ्ट केलं होतं.. तेव्हा माझ्या डोक्यावर हात फिरवून मला थोपटत झोपवलं होतंत तुम्ही... मी तो क्षण कधीच विसरू शकत नाही... एका नवोदित अभिनेत्रीला तुम्ही दिलेला सन्मान, प्रेम, संरक्षण मला बरंच काही न बोलता शिकवून गेला... तुमची आठवण कायम हृदयात राहील...! Rest in Peace ताई..... I will miss you..."


ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या अनेक आठवणी कलाकारांनी शेअर केल्या. 'ठरलं तर मग' मालिकेच्या कलाकारांसाठी तर हा मोठा धक्काच होता. प्रत्येकाच्या आठवणींमध्ये ज्योती चांदेकर या किती प्रेमळ होत्या हे जाणवतं. त्यांची मुलगी तेजस्विनी पंडित ही देखील प्रसिद्ध अभिनेत्री, निर्माती आहे. आईच्या निधनानंतर तिने फोडलेला हंबरडा पाहून सर्वांच्याच डोळ्यात अश्रू आले. 

Web Title: veena jamkar shared emotional memory of jyoti chandekar after actress demise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.