वैशाली ठक्कर सेटवरील मुलांची अशी घेते काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 13:30 IST2018-05-29T08:00:28+5:302018-05-29T13:30:28+5:30

संपूर्ण देशाला विचारात पाडणाऱ्या, पुरूषाची व्याख्या बदलणाऱ्या कर्लसची नवी मालिका "रुप-मर्द का नया स्वरुप'' २८ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ...

Vaishali Thakkar takes care of children on the set | वैशाली ठक्कर सेटवरील मुलांची अशी घेते काळजी

वैशाली ठक्कर सेटवरील मुलांची अशी घेते काळजी

पूर्ण देशाला विचारात पाडणाऱ्या, पुरूषाची व्याख्या बदलणाऱ्या कर्लसची नवी मालिका "रुप-मर्द का नया स्वरुप'' २८ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेत  आठ वर्षांचा रुपचा (अफान खान) प्रवास दाखविण्यात आला आहे. जो पुरूष आणि स्त्रिया यांनी कसे वागावे हे ठरवणाऱ्या पितृप्रधान समाजाला प्रश्न विचारत आहे. रुप-मर्द या मालिकेच्या टीमसोबत नुकतेच वैशालीने चित्रिकरणारला सुरुवात केली आहे. सध्या ती मुलांसोबत गाला टाईमचा अनुभव घेते आहे. याच्या मागचे कारण आहे फूड फेअरी वैशाली ठरते आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार शो मध्ये कौशल्या आत्याची भूमिका साकारणाऱ्या वैशालीला मुलं खूप आवडतात. चित्रकरणाच्या दरम्यान ती मुलांसाठी हेल्दी स्नॅक्स घेऊन येते आणि मुलं विशेषत: अफान खानला तिचा डबा खाणे आवडतो. नुकतेच वैशालीने मुलांच्या नाश्त्यासाठी सेटवर इडली पार्टी केली आणि त्याचवेळी तिने मुलांना हेल्दी स्नॅक्सचे महत्त्वसुद्धा पटवून दिले. 

या मालिकेत यश टोंक मुख्य भूमिका साकारत आहे. आपल्या भूमिकेविषयी सांगताना यश म्हणाला होता की, "रुप-मर्द का नया स्वरुप या मालिकेची संकल्पना अतिशय वेगळी आहे आणि माझे पात्र एक पुरूष असल्याच्या सर्व वैशिष्ट्यां विषयी आपल्याला विचार करायला लावते. मर्दानीपणाचा अभिमान असलेला एक दरोगा शमशेर सिंह कोणालाही उत्तर देत नाही आणि पुरूषीपणाचे चिन्ह म्हणून ताकतीचे प्रदर्शन करतो. पण, मी या देशातील सर्व पुरूषांना विनंती करतो की स्त्रियांना सुद्धा पुरूषांसारख्याच भावना आणि महत्वाकांक्षा असतात हे जाणून घ्या आणि आम्ही त्या सुद्धा समाजाचा एक समान हिस्सा आहेत हे कबूल केले पाहिजे. मला असे वाटते की, कलर्स आणि रश्मी शर्मा यांनी मनात खोलवर रुजलेल्या समाजावर विचार करण्यासाठी प्रेक्षकांना प्रवृत्त केले आहे. मला आता या शो मध्ये काम करण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. रुपच्या आईची कमलाची भूमिका साकारणाऱ्या मिताली नाग सांगतात, “समाज पुरूष आणि स्त्रियांची वर्तणूक ठरवत असताना रुप ही परंपरागत बंधने तोडून टाकतो. कमला ही इतर आई आणि पत्नी सारखीच आहे, जी तिच्या मुलांप्रती जास्त संरक्षक आहे आणि त्यांच्या वडिलांच्या रागापासून त्यांना वाचविण्यासाठी काहीही करायला तयार असते. विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या शो मध्ये मला सहभागी केल्याबद्दल मी या चॅनेलची आणि निर्मात्यांची आभारी आहे.”

Web Title: Vaishali Thakkar takes care of children on the set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.