​रुबिना दिलाइक बालीमध्ये करतेय व्हेकेशन एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2017 11:21 IST2017-06-05T05:51:11+5:302017-06-05T11:21:11+5:30

रुबिना दिलाइकने छोटी बहू-सिंदूर बिन सुहागन, सास बिना ससुराल, पुनर्विवाह यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या या सगळ्याच मालिका ...

Vacation angle in Rubina Baliik Bali | ​रुबिना दिलाइक बालीमध्ये करतेय व्हेकेशन एन्जॉय

​रुबिना दिलाइक बालीमध्ये करतेय व्हेकेशन एन्जॉय

बिना दिलाइकने छोटी बहू-सिंदूर बिन सुहागन, सास बिना ससुराल, पुनर्विवाह यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या या सगळ्याच मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या आहेत. या मालिकेतील भूमिकेची प्रेक्षकांनी नेहमीच प्रशंसा केली आहे. सध्या ती शक्ती-अस्तित्व के एहसास की या मालिकेत काम करत असून या मालिकेत ती तृतीयपंथीयाची भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण तिच्या या मालिकेमुळे तिचे कुटुंबीय चांगलेच नाराज झाले होते. शक्ती-अस्तित्व के एहसास की ही मालिका सुरू व्हायच्या आधी या मालिकेतील तिची भूमिका काय असणार याची कल्पना तिने तिच्या कुटुंबियांना दिली नव्हती. पण ही मालिका पाहायल्यानंतर तिच्या घरातल्यांना चांगलाच धक्का बसला. रुबिनाने एका तृतीयपंथीयाची भूमिका साकारणे तिच्या कुटुंबियांना आवडले नव्हते. पण आता त्या सगळ्यांनाच तिची मालिका आणि या मालिकेतील तिची भूमिका खूप आवडत आहे.
शक्ती-अस्तित्व के एहसास की ही मालिका सुरू होऊन नुकतेच एक वर्षं पूर्ण झाले आहे. या मालिकेला वर्षं पूर्ण झाल्याच्या आनंदात रुबिना फिरायला गेली आहे. मालिकेच्या व्यग्र चित्रीकरणातून वेळ काढून ती बाली येथे गेली आहे. बाली येथील तिचे फोटो ती सध्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटला पोस्ट करत असून या पोस्टसोबत तिने एक खूप छान कॅप्शन देखील लिहिले आहे. तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, फिरताना तुमच्या नक्कीच लक्षात येते की, आयुष्य किती सुंदर आहे. 
रुबिनाने इन्स्टाग्रामला पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 

Web Title: Vacation angle in Rubina Baliik Bali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.