कॉल सेंटरमध्ये नोकरी केली, असिस्टंट फॅशन डिझानर म्हणून करिअरची सुरुवात केली, सोप्पा नव्हता उर्फीचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 08:00 AM2023-10-15T08:00:00+5:302023-10-15T09:07:15+5:30

उर्फी जावेदने एका मुलाखतीत आपल्या खासगी आयुष्याबाबत खुलासा केला.

Urfi javed birthday special unknown facts about the actress | कॉल सेंटरमध्ये नोकरी केली, असिस्टंट फॅशन डिझानर म्हणून करिअरची सुरुवात केली, सोप्पा नव्हता उर्फीचा प्रवास

कॉल सेंटरमध्ये नोकरी केली, असिस्टंट फॅशन डिझानर म्हणून करिअरची सुरुवात केली, सोप्पा नव्हता उर्फीचा प्रवास

उर्फी जावेद बिग बॉस ओटीटीपासून तिच्या अतरंगी कपड्यांमुळे खूप चर्चेत आहे. काहीजण तिला तिच्या कपड्यांमुळे ट्रोल करत असतात. उर्फीला या सगळ्याची पर्वा नसली तरी ती ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देत असते. उर्फी जावेद ही मूळची उत्तर प्रदेशातील लखनौची आहे. 15 ऑक्टोबर 1996 रोजी जन्मलेल्या उर्फीने मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. तिला अभिनयाची खूप आवड होती. त्यामुळे उर्फी अगदी लहान वयात मुंबईत आली. 

उर्फी जावेदला 2016 मध्ये बडे भैया की दुल्हनियामध्ये अवनी पंतची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यानंतर, त्याच वर्षी तिला चंद्र नंदिनी ही मालिका मिळाली, ज्यामध्ये ती छायाच्या भूमिकेत दिसली. याशिवाय मेरी दुर्गा या शोमधून ती लोकप्रिय झाली. उर्फीने बेपन्ना, ये रिश्ता क्या कहलाता है आणि कसौटी जिंदगी की सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. 2020 मध्ये ती इतकी लोकप्रिय झाली की 2021 मध्ये तिनं बिग बॉस OTT मध्ये एंट्री घेतली.

उर्फी जावेदला खरी ओळख बिग बॉस ओटीटीनंतर मिळाली. यानंतर तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि स्टाइलची चर्चा होऊ लागली आणि आज ती स्टाइल दिवा बनली आहे. सोशल मीडियावर तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. उर्फी जावेदने एका मुलाखतीत सांगितले होते की, वडिलांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. टॉर्चर सहन केल्यानंतर ती बहिणींसोबत दिल्लीला पळून गेली.

दिल्लीत आल्यानंतर उर्फीने कॉल सेंटरमध्ये काम केले. त्यानंतर एका फॅशन डिझायनरकडे असिस्टंट म्हणूनही काम केले आणि त्यानंतर ती मुंबईत आली. उर्फी जावेद 11वीत होती तेव्हा कोणीतरी तिचा फोटो अ‍ॅडल्ट साइटवर पोस्ट केला होता. एका मुलाखतीत तिने हे सांगितले. ती म्हणाली होती की, यानंतर नातेवाईक म्हणायचे की हिचं बँक अकाऊंट चेक कर, कोट्यवधी असतील त्यात कारण ही पॉर्न स्टार झाली आहे. उर्फी जावेद आणि पारस कालनावत एकदा एकमेकांना डेट करत होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते. दोघांनी टीव्ही शो 'मेरी दुर्गा'मध्ये एकत्र काम केले होते आणि याचदरम्यान ते प्रेमात पडले. मात्र लवकरच उर्फी आणि पारसमधील नातं संपले आणि त्यांचे मार्ग वेगळे झाले.
 

 

Web Title: Urfi javed birthday special unknown facts about the actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.