​तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बबिता म्हणजेच मुनमुन दत्ताने केली समाजसेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2017 15:31 IST2017-07-08T10:01:42+5:302017-07-08T15:31:42+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेली अनेक वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील दया, जेठालाल, आत्माराम ...

In the upside of Tarak Mehta, the book 'Babita', which is titled 'Munna', is a social service | ​तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बबिता म्हणजेच मुनमुन दत्ताने केली समाजसेवा

​तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बबिता म्हणजेच मुनमुन दत्ताने केली समाजसेवा

रक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेली अनेक वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील दया, जेठालाल, आत्माराम भिडे, पोपटलाल, बबिता या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या बनल्या आहेत. या भूमिका साकारणारे दिशा वाखानी, दिलीप जोशी, मंदार चांदवलकर, श्याम पाठक, मुनमुन दत्ता या सगळ्याच कलाकारांना या मालिकेने एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. या मालिकेत प्रेक्षकांना गोकुळधाम सोसायटीतील गमतीजमती पाहायला मिळतात.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून मुनमुन दत्ता बबिता ही व्यक्तिरेखा साकारत आहे. बबिता ही प्रेक्षकांची अतिशय आवडती व्यक्तिरेखा आहे. मुनमुनला आज प्रेक्षक बबिता याच नावाने ओळखू लागले आहेत. मुनमुन खऱ्या आयुष्यात अतिशय ग्लॅमरस असली तरी तिचा अतिशय वेगळा अंदाज या मालिकेत पाहायला मिळतो. 
मुनमुन गेल्या अनेक वर्षांपासून एक खूपच चांगले काम करत असल्याचे खूपच कमी जणांना माहीत आहे. प्रत्येक मुलीला शिक्षण हे मिळालेच पाहिजे असे तिचे मत आहे. त्यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी ती नेहमीच पुढाकार घेते. तिच्या घरात घर काम करणाऱ्या बाईच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च अनेक वर्षांपासून ती करत आहे आणि आता तिच्या हेअर ड्रेसरच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे तिने ठरवले आहे. तारक मेहताच्या टीमसोबत एक हेअर ड्रेसर अनेक वर्षं काम करत होती. पण काही कारणास्तव तिने नुकतेच हे काम सोडले. काम सोडल्यावर सगळ्या टीमला भेटायला ती काही दिवसांपूर्वी सेटवर आली होती. त्यावेळी तिच्याशी बोलताना मुनमुनला कळले की, ती विधवा असून तिला दोन मुली आहेत आणि तिच्याकडे मुलींच्या शिक्षणासाठी पैसा नसल्याने तिच्या छोट्या मुलीचे शिक्षण तिने नुकतेच बंद केले आहे. त्यावर तिच्या शिक्षणाचा खर्च करण्याची तयारी मुनमुनने दाखवली. याविषयी मुनमुन सांगते, प्रत्येकाच्या आयुष्याचे एक ध्येय असले पाहिजे. कोणालाही शिकवण्यात जी मजा असते, ती कशात नाही असे मला वाटते. त्यामुळे मी शिक्षणासाठी मदत करायला नेहमीच पुढाकार घेते. 

Also Read : अखेर तारक मेहता का उल्टा चष्मामधील पोपटलालचे झाले लग्न

Web Title: In the upside of Tarak Mehta, the book 'Babita', which is titled 'Munna', is a social service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.