तारक मेहताच्या सेटवर आली ही अनोखी फॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 18:00 IST2016-12-13T18:00:11+5:302016-12-13T18:00:11+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेली कित्येक वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका अगदी लहान वयाच्या ...

A unique fan came to the set of Tarak Mehta | तारक मेहताच्या सेटवर आली ही अनोखी फॅन

तारक मेहताच्या सेटवर आली ही अनोखी फॅन

रक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेली कित्येक वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका अगदी लहान वयाच्या प्रेक्षकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. या मालिकेचे फॅन्स विविध वयोगटातील आहेत. या मालिकेच्या 108 वर्षांच्या फॅन या मालिकेच्या टीमला नुकत्याच भेटायला आल्या होत्या. 
राजस्थानमध्ये राहाणाऱ्या फूली देवी या वयाच्या 99 वर्षापासून एकही दिवस न चुकता तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे भाग बघत आहेत. या मालिकेचे सगळे भाग त्यांना तोंडपाठ आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील सगळ्या व्यक्तिरेखा या आपल्याला खूपच जवळच्या वाटत असल्याचे त्या सांगतात. या मालिकेतील जेठालाल आणि दयाबेन या व्यक्तिरेखा तर त्यांच्या जीव की प्राण आहेत. त्यामुळे आपल्या मृत्यूआधी एकदा तरी आपल्याला या व्यक्तिरेखांना खऱ्या आयुष्यात पाहायला मिळावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा नुकतीच पूर्ण झाली. या वयातही राजस्थान ते मुंबई असा प्रवास करून त्या तारक मेहताच्या सेटवर आल्या. फूली देवी सांगतात, "माझे वय आता 108 वर्षं आहे. त्यामुळे आता मी कधी शेवटचा श्वास घेईन याची खात्री नाही. त्यामुळे तारक मेहताच्या टीमला भेटावे ही माझी शेवटची इच्छा होती. आज माझी ही इच्छा पूर्ण झाली याचा मला प्रचंड आनंद आहे."
या आपल्या फॅनला भेटून तारक मेहता या मालिकेची टीमदेखील भावूक झाली होती. दिलीप जोशीने फूली देवी यांच्या पाया पडल्यानंतर त्यांनी आशीर्वाद म्हणून त्यांना 101 रुपये दिले. हे पैसे माझ्यासाठी खूप अनमोल असल्याचे दिलीप सांगतो. 

Web Title: A unique fan came to the set of Tarak Mehta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.