&TV चा २०१७ मध्ये अविस्मरणीय प्रवास…

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 10:05 IST2017-12-26T04:35:02+5:302017-12-26T10:05:02+5:30

पदार्पण आणि टेलिव्हिजनवर पुनरागमन… &TV वर मनोरंजन क्षेत्रातील बरीच मोठी नावे २०१७ मध्ये पाहायला मिळाली. सर्वात ‘दमदार’ रिअॅलिटी शो, ...

An unforgettable journey from & TV to 2017 ... | &TV चा २०१७ मध्ये अविस्मरणीय प्रवास…

&TV चा २०१७ मध्ये अविस्मरणीय प्रवास…

ार्पण आणि टेलिव्हिजनवर पुनरागमन…
&TV वर मनोरंजन क्षेत्रातील बरीच मोठी नावे २०१७ मध्ये पाहायला मिळाली. सर्वात ‘दमदार’ रिअॅलिटी शो, इंडियाज असली चॅम्पियनचा भाग म्हणून सुनील शेट्टीपासून सुरुवात झाली. त्यानंतर बॉलिवुडमधील खूप मोठी नावे जसे, गायक पलक मुछाल आणि पापॉन द व्हॉईस इंडिया किड्समध्ये शान आणि हिमेश रेशमियासह जोडली गेली. जुळ्या व्यक्तिरेखेच्या अवतारात एका वेगळ्या पटकथेसह वाणी राणी या दाक्षिण्यात्य कथेवरून साकारलेल्या दुहेरी भूमिकेत छोट्या पडद्यावर अभिनेत्री तनवी आझमीचे पुनरागमन यावर्षी झाले. &TVची प्रसिद्ध मालिका बढो बहूमध्ये एका विशेष व्यक्तिरेखेत कॉमनवेल्थ गोल्ड विजेती आणि कुस्तीवीर बबिता फोगटच्या परफॉर्मन्ससह हे वर्ष संपले. 

टेलिव्हिजनवरील नवीन युग...


&TV ने वर्षाच्या शेवटी एक वेगळी मालिका मेरी हानिकारक बीवी आणली. नसबंदीसारखा वेगळा विषय हाताळून भारतीय समाजाची आतापर्यंत असणारी प्रथा या मालिकेने मोडीत काढली. पौरुषत्व म्हणजे फक्त शारीरिक नव्हे. खर्‍या अर्थाने पुरुष असणे हे कुटुंब वाढविणे वा परंपरागत रुढीपेक्षाही अधिक काही आहे, हे सांगत आजवरचे समज मोडीत काढण्याचा या मालिकेचा हेतू आहे. 


छोट्या पडद्यावर बॉलिवुडसारखी कथा आणत, सिद्धीविनायकमध्ये बॅकग्राऊंड डान्सर आणि एक स्टार यांच्यामधील दमदार ‘द्वेष’ असणारी कथा &TV ने दाखविली. अत्यंत प्रभावी कथेसह द्वेष, नाटक, शक्ती आणि प्रेमाची भावना या सगळ्या भावनांचे मिश्रण या मालिकेत पाहायला मिळते. द्वेष आणि प्रेमाच्या सुरेख मिलाफाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे हे नक्की. 



परंपरांपासून वेगळे होऊन, राजकीय प्रभाव आणि सांस्कृतिक समजूतीतून जन्माला आलेल्या वैवाहिक बंधनाचा बाज मांडणारी कथा हाफ मॅरेजमधून &TV ने आणली. आपल्या वैवाहिक जीवनातील कोंडी आणि परस्परांच्या अगदी विरुद्ध व्यक्तिमत्व असणार्‍या अर्जुन आणि चांदनीच्या आयुष्याची ही कथा आहे. हे लग्न कोणती लढाई घेऊन येणार... की हे लग्न नवा रंग आणणार हे अजूनही प्रेक्षकांना कळायचे आहे. 


दुहेरी भूमिकेत तनवी आझमीने दमदार पुनरागमत करत वाणी राणीमध्ये आपला जम बसवला आहे. याच नावाच्या दाक्षिणात्य मालिकेवरून ही मालिका बनविण्यात आली आहे. एकाच नाण्याच्या दोन बाजू असणार्‍या मध्यमवर्गीय जुळ्या बहिणींच्या आयुष्याची ही कहाणी आहे. एकाच घरात लग्न करून जाऊ म्हणून वावरणार्‍या दोघीही एकमेकींशी बोलत नाहीत आणि नदीच्या काठासारखे समांतर जीवन जगत आहेत. कदाचित त्या एकाच दिशेने जातील, पण त्या कधी एकमेकींशी जोडल्या जातील का?


परमावतार श्री कृष्ण या भव्य मालिकेतून भगवान श्रीकृष्णाच्या ‘गोकुल के नंदलाल’ च्या कथा &TV ने दाखवल्या. आयुष्य नव्याने कसे जगावे आणि भारतीय सुपरहिरो म्हणून कृष्णाच्या आयुष्याचा प्रवास या मालिकेत दाखविण्यात आला आहे. नटखट कन्हैय्याची व्यक्तिरेखा साकारणारा निर्णय समाधिया भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात आवडता बनला आहे. 


द व्हॉईस इंडिया किड्स – सिझन 2
द व्हॉईस इंडिया या प्रसिद्ध शोच्या ग्रॅंड फिनालेसह हे सांगितिक वर्ष चालू झाले होते आणि टीम शानमधून दिल्लीच्या फरहान सबीरने त्याचे विजेतेपद पटकावले. मिका सिंग आणि मास्टर सलीम यांच्या परफॉर्मन्ससह अनुष्का शर्माच्या उपस्थितीत हा ग्रॅंड फिनाले सोहळा रंगला होता. पण लिजंडरी गायिका आशा भोसले या सोहळ्याचे खास आकर्षण ठरल्या. प्रेक्षकांकडून द व्हॉईस इंडियाला मिळणारा प्रतिसाद पाहून, नोव्हेंबर २०१७ मध्ये द व्हॉईस इंडिया किड्स सिझन २ चालू करण्यात आला. भारतातील लहान संगीताच्या जादूगारांकरिता या संगीताच्या प्रवासात ४ मार्गदर्शक – संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमिया, सतत हसता चेहरा आणि अनुरुप गायक शान, चिंतनशीर गायक-संगीतकार – पापॉन आणि गायक पलक मुछाल हेदेखील आहेत. 



कॉमेडी दंगल
विनोदवीरांच्या बटालियनने यावर्षी प्रगती केली आहे. लाफ्टर क्वीन भारती सिंगने या बटालियनचे नेतृत्व केले होते. जी यावेळी पहिल्यांदाच संगीतकार अनु मलिकसह परीक्षक म्हणून काम केले. अनु मलिकने पहिल्यांदाच कॉमेडी शैलीमध्ये परीक्षक म्हणून काम पाहिले. आपल्या विनोदी शैलीने आणि स्कीट्स आणि स्टॅंड अपने प्रसिद्ध विनोदवीरांनी प्रत्येकाला दोन टीममध्ये लढत देत हसविले. मजा आणि मस्तीने भरलेला हा हंगाम पुढेही लवकच यावा या प्रेक्षकांच्या अपेक्षेसह संपला. 




इंडियाज असली चॅम्पियन... है दम!
भारतीय टेलिव्हिजनवर एका नव्या संकल्पनेसह &TV ने फिटनेस आणि वेलनेस असा रियालिटी शो – इंडियाज असली चॅम्पियन...है दम आणला. फिटेस्ट भारतीय शोधण्याचे ध्येय घेऊन बॉलिवुडमधील खरा स्टीलमॅन सुनील शेट्टीने या मालिकेचा निवेदक म्हणून पडद्यावर पुनरागमन केले. इंडियाज असली चॅम्पियनमध्ये सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर शिवोहम आणि वृंदा मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली एकदम दमदार प्रेरणादायी प्रवास दाखविण्यात आला. आपले शरीर साथ देत नसतानाही आपल्या मानसिक बळावर कुठपर्यंत पोहचता येते हेदेखील स्पर्धकांची परीक्षा घेऊन पाहण्यात आले. खेळ, फिटनेस आणि खर्‍या भावनांवर आधारित या शोमध्ये एक ताज्या दमाच्या दृष्टीकोनासह आयुष्याकडे पाहण्याचा आणि प्रेक्षकांनाही आरोग्यासाठी अधिक प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 



म्युझिक की पाठशाला

टेलिव्हिजनवर येण्याची संधी फार क्वचित मिळणार्‍या मुलांना त्यांचे कौशल्य दाखविता यावे आणि शिकण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे यासाठी हा शो तयार केला गेला होता. &TV  ने स्वतःची संगीत शाळा चालू करण्याचा निर्धार केला. ज्यातून प्रत्येक भागामध्ये एका नव्या मार्गदर्शकाच्या निरीक्षणाखाली संगीत शिकणे आणि त्यांच्या कक्षा रुंदावण्यासाठी २० प्रतिभाशाली उत्कृष्ट संगीतकारांना व्यासपीठ देण्यात आले. या शो मध्ये स्पर्धक बाहेर जात होते पण केवळ शिकणे हा एकच उद्देश होता. कक्कर भगिनी, हर्षदीप कौर, शान, अनु मलिक, जावेदी अली यासारख्या संगीत शिक्षकांनी एकत्रित येऊन मुलांना संगीताचे धडे दिले. ही शाळा चालविण्यासाठी सूत्रसंचालक म्हणून गायक राहुल वैद्यचे छोट्या पडद्यावर पुनरागमन झाले. 



Web Title: An unforgettable journey from & TV to 2017 ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.