प्रियासाठी उमेश बसला गुडघ्यावर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 00:11 IST2016-03-16T07:11:39+5:302016-03-16T00:11:39+5:30
ये इश्क नही आसान, बस इतना समज लिजीए... इक आग का दर्या है, और ...
.jpg)
प्रियासाठी उमेश बसला गुडघ्यावर...
सीएनएक्ससोबत प्रियाने तिच्या उमेशसोबतच्या डेटिंगच्या दिवसांना उजाळा दिला अन ती त्या रोमँटिक दिवसांमध्ये अगदी हरवूनच गेली. प्रिया सांगतीये, उमेश मी आणि माझी मैत्रिण आम्ही तिघे एकदा ट्रेनने प्रवास करीत होतो. मला गायची आवड होतीच अन उमेश माझ्या गाण्यावर खुपच फिदा होता. तो नेहमी मला गायला लावायचा अन मलाही त्याच्यासाठी गायला आवडायचे.
जेव्हा आम्ही डेटींग करायचो त्यावेळी मस्त बाईकरुन लाँग ड्राईव्हला जायचो मग त्यावेळेस मी मागे बसुन त्याच्यासाठी खुप गाणी गायचे. त्या दिवशी आम्ही उमेश सोबत जेन्ट्स डब्यात चढलो होतो, आणि त्याने मला चक्क तिथे गाणे गायला सांगितले. इथे कसं गाण गायच म्हणुन मी त्याला नाही म्हणाले तर हा महाशय चक्क मुलीला प्रपोज करताना जसे गुडघ्यावर बसतात तसा ट्रेनमध्ये माझ्यासमोर हात जोडुन गुडघ्यावर बसला अन मला गाणे गायला सांगितले. एकदम फिल्मी पद्धतीचा हा सीन उमेशने फक्त प्रियाचे गाणे ऐकण्यासाठी केला खरा पण तिच्या ह्रद्यात तो कायमचा कैद होऊन गेला.