दोन सोनाली पहिल्यांदा एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 23:37 IST2016-02-27T06:32:05+5:302016-02-26T23:37:13+5:30
एकाच नावाच्या दोन व्यक्ती असेल तर फार आश्चर्य वाटते. पण जेव्हा एकाच नावाच्या दोन व्यक्ती एकाच इंडस्ट्रीमध्ये असेल तर ...

दोन सोनाली पहिल्यांदा एकत्र
ए ाच नावाच्या दोन व्यक्ती असेल तर फार आश्चर्य वाटते. पण जेव्हा एकाच नावाच्या दोन व्यक्ती एकाच इंडस्ट्रीमध्ये असेल तर इंडस्ट्रीसह, प्रेक्षक व मिडीयाची देखील तारांबळ उडते. या दोन व्यक्ती म्हणजे मराठी इंडस्ट्रीच्या सुंदर तारका सोनाली कुलकर्णी. या दोघींची ओळख सांगण्यासाठी प्रेक्षकांनी देखील छोटी सोनाली-मोठी सोनाली, सीनिअर सोनाली-ज्युनिअर सोनाली, अप्सरावाली सोनाली-दिल चाहतावाली सोनाली अशी वेगवेगळी नावेदेखील त्यांना दिली आहे. गंमत म्हणजे, मिडीया व प्रेक्षकांची तारांबळ उडू नये म्हणून या दोन सोनालींनी आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्येच बदल केला आहे. सीनिअर सोनालीने इंग्रजी नावाच्या स्पेलिंगमध्ये आय लिहिते तर ज्युनिअर सोनाली डबल ई लिहीते.किती अवघड असतं ना एकाच नावाच्या दोन व्यक्तींच.असो,पण या दोन सोनाली कुलकर्णीनी पहिल्यांदा एकत्रित फोटो क्लिक केला आहे. या फोटोविषयी एक सोनाली म्हणते, हा फोटो हजार शब्द सांगतो. तर दुसरी म्हणते खूप महत्वाचा हा फोटो आहे. या दोघी काहीही म्हणो,पण शेवटी,या दोघी एका फ्रेममध्ये आल्याच आणि प्रेक्षकांची दोघींना सोबत पाहण्याची उत्सुकतादेखील संपविली.