​आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी केले 'दुहेरी'चे 2डी कोलाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2017 12:58 IST2017-06-08T06:17:56+5:302017-06-08T12:58:10+5:30

स्टार प्रवाहच्या 'दुहेरी' मालिकेतील कथानकाचा गुंता सातत्याने वाढत आहे. त्यामुळे स्वाभाविकच या मालिकेची लोकप्रियताही वाढत आहे. ही मालिका सुरू ...

Two-D Collage of 'Duali' done by architect students | ​आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी केले 'दुहेरी'चे 2डी कोलाज

​आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी केले 'दुहेरी'चे 2डी कोलाज

टार प्रवाहच्या 'दुहेरी' मालिकेतील कथानकाचा गुंता सातत्याने वाढत आहे. त्यामुळे स्वाभाविकच या मालिकेची लोकप्रियताही वाढत आहे. ही मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांना या मालिकेबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. या मालिकेतील मैथिली, परसु, दुष्यन्त या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेत दाखवला जाणारा कौटुंबिक थरार तर प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या सगळ्या कारणामुळे ही मालिका प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय झाली आहे. 
दुहेरी ही मालिका सगळ्याच वयोगटातील लोक आवडीने पाहातात. आजच्या तरुण पिढीची तर ही लाडकी मालिका आहे. काही युवा प्रेक्षकांनी या मालिकेवर असलेले त्यांचे प्रेम अनोख्या पद्धतीने व्यक्त केले आहे. विवा आर्किटेक्चर कॉलेजच्या सिद्धेश पेडणेकर आणि प्रणाली सावंत या दोन विद्यार्थ्यांनी या मालिकेचे 2डी कोलाज तयार केले आहे. त्यांनी तयार केलेला हा कोलाज त्यांनी नुकताच या मालिकेत दुष्यन्तची व्यक्तिरेखा साकारत असलेल्या संकेत पाठकला भेट म्हणून दिला. हा कोलाज अतिशय सुंदर आहे. हा कोलाज 'दुहेरी' या मालिकेच्या टीममधील सगळ्यांनाच खूप आवडला. संकेत पाठकला तर हा कोलाज प्रचंड आवडला आहे. तो या कोलाजच्या प्रेमात पडला आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण त्याने हा कोलाज लगेचच सोशल मीडियावर शेअर केला. हा कोलाज संकेतच्या फॅन्सना देखील खूप आवडला आहे. त्यांनी यावर सोशल मीडियावर खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर या कोलाजला अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यामुळे त्याच्या या पोस्टला सोशल मीडियातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. 

Web Title: Two-D Collage of 'Duali' done by architect students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.