आदित्य आणि झोयाच्या प्रेमात येणार ट्वीस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 07:15 IST2018-08-13T16:20:15+5:302018-08-14T07:15:00+5:30
बेपनाहमध्ये झोया आणि आदित्य या दोन अनोळखी व्यक्तींना नशीबाने एकत्र आल्यानंतर घडणारी अशक्य गोष्ट सांगीतलेली आहे आणि त्यात ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र बनतात

आदित्य आणि झोयाच्या प्रेमात येणार ट्वीस्ट
कलर्सचा लोकप्रिय शो बेपनाहमध्ये झोया आणि आदित्य या दोन अनोळखी व्यक्तींना नशीबाने एकत्र आल्यानंतर घडणारी अशक्य गोष्ट सांगीतलेली आहे आणि त्यात ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र बनतात. आदित्यला अखेरीस झोयावर त्याचे प्रेम आहे हे कळून चुकते आणि तो तसेच झोयाला वाटावे यासाठी प्रयत्न करतो. पण झोयाचे वडील वसीम यांनी झोयासाठी वेगळेच काहीतरी योजले आहे आणि तिने एका सुस्थापित मुलाशी लग्न करून आनंदाने जगावे अशी त्यांची इच्छा आहे. आदित्य आणि झोयाच्या प्रेमकथेमध्ये अजून एक मनोरंजक कलाटणी आणणार आहे अर्शद हबीबचा प्रवेश आणि ही भूमिका साकारत आहे गुणवान अभिनेता ताहेर शब्बीर.
झोयाचे वडील वसीम यांच्या मते व्यवसायाने डॉक्टर असलेला अर्शद हा झोयासाठी योग्य वर आहे. अनेक वर्षे लंडनमध्ये राहून सुध्दा तो साधा आहे आणि त्याची मूल्ये विसरलेला नाही. अर्शद हा गोड आणि साधा मुलगा असून त्याला झोयाच्या लग्नाविषयीच्या कल्पना कळाल्या आहेत आणि म्हणून तो तिला मित्र म्हणून त्याला स्विकारण्यास सांगतो. पण प्रत्येक दिवशी जसे अर्शद झोयाला जाणू लागतो तो तिच्या प्रेमात पडतो. शो मधील त्याच्या प्रवेशा विषयी बोलताना ताहेर शब्बीर म्हणाला, “ बेपनाहची नवीन आणि लक्षवेधक संकल्पने मुळे मी ही भूमिका स्विकारली आहे. बेपनाह हा टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त लोकप्रिय शो आहे आणि त्यात सहभागी होण्याचा मला आनंद आहे. माझे पात्र असलेला अर्शद हा एक डॉक्टर असून त्याचे व्यक्तिमत्व आकर्षक आहे आणि तो झोया आणि आदित्यच्या प्रेमकथे मध्ये तिसरे चाक बनून येणार आहे. मी आता दीर्घ काळानंतर टेलिव्हिजन वर येत आहे त्यामुळे मी त्यात जीव ओतून काम करणार आहे आणि अशा टॅलेंटेड टीम सोबत पुढेही काम करण्याची माझी इच्छा आहे. मला आशा आहे की या नव्या भूमिकेत प्रेक्षक माझी प्रशंसा करतील आणि त्यांना ती आवडेल.”