मुलाखत घेताना ‘हा’ टीव्ही स्टार अचानकच पडला बेशुद्ध; भीतीपोटी भारती सिंगने केली आरडाओरड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 16:49 IST2018-05-29T10:08:20+5:302018-05-29T16:49:46+5:30

राजीव खंडेलवाल सध्या टीव्हीवर वीकेण्ड चॅट शो ‘जज्बात...’ घेऊन येत आहे. या शोमध्ये ते स्टार्सला आमंत्रित करून त्यांच्या प्रवासाबद्दल ...

'This' TV star suddenly fell unconscious while interviewing; Bharti Singh Bharti singh shouted! | मुलाखत घेताना ‘हा’ टीव्ही स्टार अचानकच पडला बेशुद्ध; भीतीपोटी भारती सिंगने केली आरडाओरड!

मुलाखत घेताना ‘हा’ टीव्ही स्टार अचानकच पडला बेशुद्ध; भीतीपोटी भारती सिंगने केली आरडाओरड!

जीव खंडेलवाल सध्या टीव्हीवर वीकेण्ड चॅट शो ‘जज्बात...’ घेऊन येत आहे. या शोमध्ये ते स्टार्सला आमंत्रित करून त्यांच्या प्रवासाबद्दल चर्चा घडवून आणतात. ज्यामध्ये संघर्ष आणि आयुष्यातील चढ-उतार या सर्वांचा आवर्जुन उल्लेख केला जातो. या शोमध्ये बरूण सोबती, एजाज खान, दिव्यांका त्रिपाठी, इकबाल खान, धीरज धूपर यांच्यासह बºयाचशा कलाकारांनी आतापर्यंत एंट्री केली आहे. यावेळेस कॉमेडियन भारतीय सिंग पती हर्ष लिम्बाचियासोबत शोमध्ये आली होती. हे दोघे शोदरम्यान, त्यांच्या आयुष्यातील काही मजेशीर आणि रोमॅण्टिक क्षण यावर चर्चा करीत होते. यावेळी चेष्टामस्करी आणि कॉमेडीच्या वातावरणाने शोमध्ये चांगलीच रंगत आली होती. राजीव खंडेलवालदेखील त्यांच्याशी बोलताना चांगलेच रंगून गेले होते. 

तेव्हा अचानकच असे काही घडले की, सर्वांची एकच तारांबळ उडाली. राजीव खंडेलवाल अचानक बेशुद्ध पडले. त्यांची स्थिती बघून भारती सिंग तर खूपच घाबरून गेली होती. तिने आरडाओरड करीत मदतीसाठी इतरांना बोलाविण्यास सुरुवात केली. भारतीची आरडाओरड ऐकून काही क्षणांतच सेटवर लोकांची गर्दी झाली. मात्र अचानकच राजीव खंडेलवाल उठून उभे राहिल्यामुळे भारतीला आणखीनच धक्का बसला. राजीवने भारतीला म्हटले की, मी तुझ्याशी चेष्टा करीत होतो. मात्र तोपर्यंत भारती प्रचंड घाबरून गेली होती. तिला राजीवच्या या विचित्र मस्करीवर काय बोलावे याबाबतचे शब्दच नव्हते.



वास्तविक अशाप्रकारची चेष्टा-मस्करी स्टार्समध्ये नेहमीच बघावयास मिळत असते. बºयाचदा तर भारतीनेही अनेकांची अशी फिरकी घेऊन त्यांना झटका दिला आहे. मात्र यावेळेस ती स्वत: राजीवच्या जाळ्यात अडकली. राजीवने अशाप्रकारे प्रॅँक करून भारतीची बोलतीच बंद केली. एकूणच नेहमीच कॉमेडीचे बॉम्ब फोडणारी भारती यावेळेस मात्र स्वत:च शिकार बनताना दिसून आली. 

Web Title: 'This' TV star suddenly fell unconscious while interviewing; Bharti Singh Bharti singh shouted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.