रिक्षातून फिरताना दिसली ही लोकप्रिय अभिनेत्री, कोणाला कळू नये म्हणून देसी अंदाजात फिरत होती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 15:23 IST2021-02-10T15:20:29+5:302021-02-10T15:23:20+5:30

कोणी ओळखू नये म्हणून तिने कुर्ता आणि  चेह-यावर मास्क लावला होता. त्यामुळे तिला कुणीच ओळखलं नाही.

Tv Actress Ridhima Pandit Auto Ride In Mumbai Video Goes Viral On Social Media | रिक्षातून फिरताना दिसली ही लोकप्रिय अभिनेत्री, कोणाला कळू नये म्हणून देसी अंदाजात फिरत होती

रिक्षातून फिरताना दिसली ही लोकप्रिय अभिनेत्री, कोणाला कळू नये म्हणून देसी अंदाजात फिरत होती

सेलिब्रिटींसह फोटा काढावा, त्यांच्यासह सेल्फी असावा,ऑटोग्राफ घ्यावा किंवा मग एक झलक तरी पाहायला मिळावी अशी फॅन्सची इच्छा असते. मात्र सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात एक अभिनेत्री मुंबईमध्ये रिक्षामध्ये फिरताना दिसली कोणी ओळखू नये म्हणून तिने कुर्ता आणि  चेह-यावर मास्क लावला होता. त्यामुळे तिला कुणीच ओळखलं नाही.

मात्र मीडियाने तिला ओळखलंच ही अभिनेत्री होती टीव्ही मालिका 'बहू हमारी रजनीकांत' मधून रजनीची भूमिका करून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रिद्धीमा पंडीत. जेव्हा मीडियाने तिला पाहिले तेव्हा मात्र रिद्धीमा चेहरा लपवतानाही दिसली. सोशल मीडियावरही बरीच एक्टिव्ह असते. कायमच ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. सध्या रिक्षातून फिरतानाचा तिचा हा व्हिडीओ फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे.


कलाकार मंडळी मालिका आणि सिनेमात अभिनय करण्याबरोबरच इतर गोष्टींमध्येही विशेष लक्ष देऊ लागले आहेत. कलाकार अभिनयासोबातच इतर गोष्टींमध्येही ते पारंगत असतात. रिद्धीमाही उत्तम बॉलिवूड कलाकारांची नक्कल करते. 'बहु हमारी रनजी-कांत' मालिकेची 'रजनी द रोबोट'ची भूमिका तिच्या उत्तम नक्कल करण्याच्या कौशल्यामुळेच मिळाली होती. जेव्हा सेटवर शूटिंगमधून रिद्धीमाला वेळ मिळायचा.तेव्हा रिद्धीमा रेखा, हेमामालिनी आणि श्रीदेवी यांच्या नक्कल करत फुल ऑन मनोंरजन करत असल्याचे तिचे सहकलाकार सांगायचे.

याविषयी रिद्धीमाने सांगितले होते की, लहानपणापासूनच मला नक्कल करायला आवडते. माझ्या कुटुंबात होणा-या कार्यक्रमात मी नेहमी आमच्या कुटुंबाच्या सदस्याची किंवा मग बॉलिवूड कलाकारांच्या हुबेहुबे नक्कल करून दाखवायचे. माझ्या नक्कल करण्याच्या कौशल्यामुळे माझ्या कुटुंबाची आणि मित्रमंडळींचे चांगले मनोरंजन व्हायचे.एखाद्या कलाकाराची नक्कल करणे म्हणजे त्या कलाकाराची स्तुती करण्यासारखे असते. त्यामुळे जेव्हा मी माझ्या चाहत्यांना माझ्या भूमिकेची नक्कल करताना पाहते तेव्हा मला खूप आनंद होत असल्याचे रिद्धीमाने सांगितले होते.

Web Title: Tv Actress Ridhima Pandit Auto Ride In Mumbai Video Goes Viral On Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.